सायली संजीव तिच्या इन्स्टाग्राम या सोशल नेटवर्किंग अकाऊंटवर नेहमीच विविध फोटो पोस्ट करत असते. त्यामुळे तिच्या अकाऊंटला अनेक जण फॉलो करतात. गौरीने नुकतेच एक ग्लॅमरस फोटोशूट केले असून यातील काही बोल्ड फोटो तिच्या इन्स्टाग्रामच्या अकाऊंटला पोस्ट केले आहेत. सध्या तिच्या या फोटोंची चांगलीच चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे. या फोटोत सायलीचा एक वेगळाच अंदाज आपल्याला पाहायला मिळत आहे. सायलीच्या या फोटोला तिच्या फॅन्सने देखील खूप चांगला प्रतिसाद दिला आहे. त्यांनी सायलीच्या या फोटोला खूप सारे लाइक्स दिले असून अनेकांनी तिच्या या फोटोवर कमेंट केले आहे.
सायलीचा हा लूक पाहाता एखाद्या चित्रपटात सायली आपल्याला एका वेगळ्या अंदाजात दिसू शकेल असे आपण नक्कीच म्हणू शकतो. सायलीने एकांकिकांद्वारे तिच्या अभिनयप्रवासाला सुरुवात केला. त्यानंतर तिने काही जाहिरातींमध्ये देखील काम केले. प्रियांका चोप्रासोबत तिने एक जाहिरात केली होती. त्यानंतर तिने पोलिस लाइन या चित्रपटात काम केले.
सायलीला आता अभिनयासोबतच तिच्या शिक्षणाकडे देखील लक्ष द्यायचे आहे. ती लवकरच एम.ए साठी प्रवेश घेणार असून भविष्यात तिला पॉलिटिकल सायन्समध्ये पी.एच.डी. करण्याची इच्छा आहे.
Also Read : हा पाहा सायली संजीवचा लहानपणीचा फोटो