Join us

​काहे दिया परदेस फेम सायली संजीवचा बोल्ड लूक तुम्ही पाहिला का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2017 12:25 IST

​काहे दिया परदेस फेम सायली संजीवने नुकतेच एक ग्लॅमरस फोटोशूट केले असून यातील काही बोल्ड फोटो तिच्या instagramच्या अकाऊंटला पोस्ट केले आहेत. या फोटोला तिच्या चाहत्यांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे.

काहे दिया परदेस या मालिकेत सायली संजीवने गौरी ही व्यक्तिरेखा साकारली होती. गौरी ही अतिशय संमजस, घरातील वडिलधाऱ्या माणसांचा आदर राखणारी अशी दाखवण्यात आली होती. या कार्यक्रमाच्या सुरुवातीला सायली आपल्याला पंजाबी ड्रेसमध्ये पाहायला मिळाली. त्यानंतर या मालिकेत तिचे शीवसोबत लग्न झाल्यावर तर ती आपल्याला नेहमीच साड्यात दिसून आली. एवढेच नव्हे तर ती उत्तर भारतीय कुटुंबात लग्न करून गेली असे मालिकेत दाखवण्यात आले असल्यामुळे तिच्या डोक्यावर आपल्याला नेहमी पदरदेखील पाहायला मिळाला. मालिकेत गौरी ही व्यक्तिरेखा अतिशय साधी असल्याने सायलीला मालिकेत तसाच पेहराव करावा लागला. पण तुम्हाला माहीत आहे का खऱ्या आयुष्यात सायली ही भारतीय पेहरावासोबत पाश्चिमात्य कपड्यांमध्येही अनेकवेळा पाहायला मिळते. सायली संजीव तिच्या इन्स्टाग्राम या सोशल नेटवर्किंग अकाऊंटवर नेहमीच विविध फोटो पोस्ट करत असते. त्यामुळे तिच्या अकाऊंटला अनेक जण फॉलो करतात. गौरीने नुकतेच एक ग्लॅमरस फोटोशूट केले असून यातील काही बोल्ड फोटो तिच्या इन्स्टाग्रामच्या अकाऊंटला पोस्ट केले आहेत. सध्या तिच्या या फोटोंची चांगलीच चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे. या फोटोत सायलीचा एक वेगळाच अंदाज आपल्याला पाहायला मिळत आहे. सायलीच्या या फोटोला तिच्या फॅन्सने देखील खूप चांगला प्रतिसाद दिला आहे. त्यांनी सायलीच्या या फोटोला खूप सारे लाइक्स दिले असून अनेकांनी तिच्या या फोटोवर कमेंट केले आहे.    सायलीचा हा लूक पाहाता एखाद्या चित्रपटात सायली आपल्याला एका वेगळ्या अंदाजात दिसू शकेल असे आपण नक्कीच म्हणू शकतो. सायलीने एकांकिकांद्वारे तिच्या अभिनयप्रवासाला सुरुवात केला. त्यानंतर तिने काही जाहिरातींमध्ये देखील काम केले. प्रियांका चोप्रासोबत तिने एक जाहिरात केली होती. त्यानंतर तिने पोलिस लाइन या चित्रपटात काम केले.सायलीला आता अभिनयासोबतच तिच्या शिक्षणाकडे देखील लक्ष द्यायचे आहे. ती लवकरच एम.ए साठी प्रवेश घेणार असून भविष्यात तिला पॉलिटिकल सायन्समध्ये पी.एच.डी. करण्याची इच्छा आहे. Also Read : ​हा पाहा सायली संजीवचा लहानपणीचा फोटो