Join us
Daily Top 2Weekly Top 5

ड्रामा कंपनीचा नवा प्रोमो तुम्ही पाहिला का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2017 11:52 IST

ड्रामा कंपनीचा नवा प्रोमो नुकताच लाँच करण्यात आला. या प्रोमोत प्रेक्षकांना सुदेश लहरीला पाहायला मिळत आहे. या प्रोमोत तो आपलाच मोठेपणा करताना दिसत आहे.

सुदेश लहरी, कृष्णा अभिषेक, सुगंधा मिश्रा, डॉ संकेत भोसले आणि अली असगर यांसारखे कॉमेडीतील दिग्गज कलाकार आपल्याला द ड्राम कंपनी या कार्यक्रमामध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. या कार्यक्रमाचा एक प्रोमो काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. या प्रोमोत सुदेश, कृष्णा, सुगंधा, संकेत आणि अली हे सगळेच कलाकार वाळूत बसलेले पाहायला मिळाले होते. या सगळ्या कलाकारांना मिथुन चक्रवर्ती त्यांना धमकावत होता. शंभू दादा हमे माफ कर दो अशी विनवण्या ते करत होते. डॅामा कंपनीचा हा प्रोमो चांगलाच हिट झाला होता. आता एक नवा प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. या प्रोमोमध्ये आपल्याला केवळ सुदेश लहरीच दिसत आहे. तो या प्रोमोमध्ये मी ड्राम कंपनीचा शेजारी असल्याचे सांगत आहे आणि त्याचसोबत त्याचा मोठेपणा सांगत आहे. मी गुड लुकिंग आहे, माझ्याकडे खूप सारा पैसा आहे अशा शब्दांत तो स्वतःचे कौतुक करत आहे. तसेच आता मी प्रोड्युसर बनलो आहे असेही तो सांगत आहे. सुदेशचे एक वेगळे रूप प्रेक्षकांना यात पाहायला मिळत आहे. सत्तरच्या दशकातील हिरो प्रमाणे त्याचा लुक या प्रोमोत दिसत आहे. या प्रोमोतून सुदेशने प्रेक्षकांना खळखळून हसवले आहे. ड्राम कंपनीच्या मार्फत देखील तो प्रेक्षकांचे असेच मनोरंजन करेल यात काही शंका नाही.आजच्या सगळ्या कॉमेडी शोजना हा कार्यक्रम मागे टाकणार असल्याचा कलाकारांना विश्वास असल्यामुळे ही मंडळी या कार्यक्रमासाठी फुल ऑन मेहनत घेत आहेत. रसिकांनाही त्याच त्याच गोष्टी पाहण्यात आता रस उरलेला नाही. त्यामुळे हटके कॉन्सेप्ट या नवीन शोमध्ये पाहायला मिळणार असल्याचे कळतेय.