Join us

संकर्षण कऱ्हाडेच्या सख्या भावाला पाहिलंत का ? तो देखील आहे मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध चेहरा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2023 17:30 IST

तुम्हाला माहिती आहे का संकर्षण प्रमाणेच त्याचा भाऊ देखील अभिनेता आहे.

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता, कवी आणि उत्तम सूत्रसंचालक म्हणून नाव कमावणारा अभिनेता म्हणजे संकर्षण कऱ्हाडे (sankarshan karhade). आपल्या कलागुणांमुळे संकर्षण अल्पावधीत लोकप्रिय झाला. त्यामुळे आज त्याचा प्रचंड मोठा चाहतावर्ग असल्याचं पाहायला मिळतं.  नाटक, मालिका अशा विविध माध्यमातून त्याने प्रेक्षकांची मनं जिंकली. संकर्षण सोशल मीडियावर प्रचंड अ‍ॅक्टिव्ह आहे. पण तुम्हाला माहिती आहे का संकर्षण प्रमाणेच त्याचा भाऊ देखील अभिनेता आहे. 

संकर्षण प्रमाणेच त्याचा भाऊ देखील अभिनेता आहे. स्टार प्रवाहवरील पिंकीचा विजय असो (pinkicha vijay asoo) या मालिकेत संकर्षणाचा भाऊ अधोक्षज बंटीची भूमिका साकारतो आहे. अधोक्षज कऱ्हाडेने (adhokshaj karhade ) सोशल मीडियावर सक्रिय असतो. आपले फोटो आणि व्हिडीओ तो शेअर करत असतो. अधोक्षज कऱ्हाडेसु्द्धा लहानपणापासून नाटकांमध्ये काम करत आहे. अधोक्षजने झी मराठीवरील महाराष्ट्राचा सुपरस्टार या रिऍलिटी शोमध्ये सहभागी झाला होता. शांतता! मराठीचं कोर्ट चालू आहे, या लघुपटात देखील तो दिसला आहे.

आता तो पिंकीचा विजय असो या मालिकेत दिसतोय. या मालिकेत त्याच्यासोबत अमिता खोपकर, पियुष रानडे, हर्षद नायबळ, अंकिता जोशी, कल्याणी जाधव, मुकेश जाधव, सुनील तावडेमुख्य भूमिकेत दिसणार आहे. 

टॅग्स :टिव्ही कलाकार