Join us
Daily Top 2Weekly Top 5

सुपर डान्सर या कार्यक्रमातील ​शिल्पा शेट्टीचा मराठमोळा लूक पाहिला का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2017 16:02 IST

शिल्पा शेट्टी सध्या सुपर डान्सर या कार्यक्रमात परीक्षकाची भूमिका साकारत आहे. या कार्यक्रमाचे आजवरचे सगळेच सिझन गाजले आहेत. या ...

शिल्पा शेट्टी सध्या सुपर डान्सर या कार्यक्रमात परीक्षकाची भूमिका साकारत आहे. या कार्यक्रमाचे आजवरचे सगळेच सिझन गाजले आहेत. या कार्यक्रमांच्या यंदाच्या सिझनला देखील प्रेक्षकांचे चांगलेच प्रेम मिळत आहे. या सिझनमधील चिमुकले स्पर्धक एकाहून एक सरस परफॉर्मन्स सादर करत आहेत. त्यामुळे कोणता स्पर्धक या कार्यक्रमात बाजी मारणार याची उत्सुकता प्रेक्षकांना लागलेली आहे. 
सुपर डान्सच्या नुकत्याच चित्रीत झालेल्या भागात शिल्या शेट्टीचा एक वेगळाच अंदाच पाहायला मिळाला. या कार्यक्रमात शिल्पा आपल्याला अनेकवेळा साडीमध्ये पाहायला मिळते. पण यंदाच्या भागात तिने नऊवारी साडी नेसली होती. या लूकमध्ये तिचे सौंदर्य आणखीनच खुलून दिसत होते. गुलाबी रंगाच्या साडीत शिल्पा खूपच सुंदर दिसत होती. या साडीला साजेशी तिने हेअर स्टाइलदेखील केली होती. या लूकमध्ये शिल्पा अगदी मराठी मुलीसारखीच दिसत होती.
सुपर डान्सरच्या भागात आरुषीने नुकतेच कोळी गीत सादर केले. कोळी गीतावर नृत्य सादर करणे सोपे नसल्याचे आरुषीचे म्हणणे असल्याने त्यासाठी तिने खूप मेहनत घेतली होती. तिने या नृत्यासाठी अनेक तास तालीम केली होती. रिश्ते या चित्रपटात शिल्पा शेट्टीने एका कोळी स्त्रीची व्यक्तिरेखा सादर केली होती. ही तिची भूमिका आरुषीला खूपच आवडते. त्यामुळे आरुषीने कोळी नृत्य चांगल्याप्रकारे सादर करण्यासाठी शिल्पाचा हा चित्रपट आणि विशेषतः या चित्रपटातील तिच्या नृत्याचे बारकाईने निरीक्षण केले. आरुषीने घेतलेल्या या मेहनतीमुळे तिने हे नृत्य खूपच चांगल्याप्रकारे सादर केले. या तिच्या नृत्याचे कौतुक शिल्पासोबतच या कार्यक्रमाचे परीक्षक अनुराग बासू आणि गीता कपूर यांनी देखील केले. या कार्यक्रमात खास परीक्षक म्हणून बाबा रामदेव यांनी हजेरी लावली होती. त्यांना देखील आरुषीचे नृत्य खूपच आवडले. त्यांनी देखील आरुषीचे तोंडभरून कौतुक केले. शिल्पा तर आरुषीच्या नृत्याच्या प्रेमातच पडली होती असे म्हटले तरी चुकीचे ठरणार नाही. तिने देखील आरुषी सोबत कोळी नृत्यावर ताल धरला. यावेळी शिल्पाचा एक वेगळा अंदाज सगळ्यांना पाहायला मिळाला. 

Also Read : ​अक्षयकुमारच्या एक्स गर्लफ्रेंड रविना टंडन अन् शिल्पा शेट्टी एकाच व्यासपीठावर आल्या असता काहीसे असे घडले!