मौनी रॉयचे हे हॉट फोटो तुम्ही बघितले का ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2017 17:34 IST
टीव्ही अभिनेत्री मौनी रॉय सध्या बॉलिवूडमध्ये चांगलाच चर्चेचा विषय बनलेली आहे. मौनी बॉलिवूडमध्ये खिलाडी अक्षय कुमासह डेब्यू करण्यास सज्ज ...
मौनी रॉयचे हे हॉट फोटो तुम्ही बघितले का ?
टीव्ही अभिनेत्री मौनी रॉय सध्या बॉलिवूडमध्ये चांगलाच चर्चेचा विषय बनलेली आहे. मौनी बॉलिवूडमध्ये खिलाडी अक्षय कुमासह डेब्यू करण्यास सज्ज झाली आहे. नागिन फेम मौनी रॉय गोल्ड चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करते आहे. यात ती अक्षय कुमारच्या अपोझिट दिसणार आहे. त्यामुळे ती सध्या स्वत:वर जास्त लक्ष देते आहे. टीव्हीवर धुमाळ घातल्यानंतर ती मोठ्य पडद्यावरसुद्धा रॉक करायला तयार आहे. सोशल मीडियावर मौनी सतत एक्टिव्ह आहे. सतत आपले फोटो मौनी आपल्या फॅन्ससोबत इन्स्टाग्रामवर पोस्ट करत असते. पहिल्या फोटोत मौनीने ब्लॅक कलरचा क्रॉप टॉप परिधान केला आहे. मखमली लूंगी लपेटून बसली आहे. तिचा फोटो तिच्या फॅन्सना खूप आवडला आहे. तर दुसऱ्या फोटोत मौनीने ब्लॅक डीप नेकचा टॉप आणि लाईन्स वाली पँट घातली आहे. क्रॉप टॉप वाल्यला फोटोला दोन दिवसात 25 लाख 9 हजार 517 लोकांनी लाईक्स केले आहे. तर दुसऱ्या फोटोला 22 तासांच्या आत 21 लाख 3 हजार 228 लोकांनी बघून लाईक केले आहे. ALSO READ : अक्षय कुमारवर का नाराज आहे मौनी रॉय?नुकतीच मौनी इंग्लंडला जाऊन आली आहे. गोल्डच्या शूटिंगसाठी मौनी लंडना गेली होती. हा चित्रपट भारतीय हॉकी संघावर आधारित आहे. बलबीर सिंग यांच्या नेतृत्वाखाली भारतीय हॉकी संघाने तीनेळा ऑलिम्पिंकमध्ये गोल्ड मेडल जिंकले होते. यात बलबीर सिंग यांची भूमिका अक्षय कुमार साकारणार आहे. 15 ऑगस्टला 2018ला मौनीचा गोल्ड हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे, तब्बल 13 वर्ष छोट्या पडद्यावर काम केल्यानंतर मौनीली बॉलिवूडमध्ये झळकण्याची संधी मिळाली आहे.