Join us

'आई कुठे काय करते'मधील अरुंधतीचा नवा लूक पाहिलंत का?, फोटो झाले व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2021 07:00 IST

अरूंधतीचा नवा लूक चाहत्यांना भावतो आहे.

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका 'आई कुठे काय करते'ने कमी कालावधीत प्रेक्षकांच्या घरात मन केले आहे. या मालिकेतील सर्वच पात्रांना प्रेक्षका्च्या मनात घर केले आहे. या मालिकेत अरूंधतीची भूमिका अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर हिने साकारली आहे. नुकतेच मधुराणी प्रभुलकर हिने सोशल मीडियावर फोटो शेअर केले आहे. त्यात तिचा नवा लूक पहायला मिळतो आहे.

मधुराणी प्रभुलकर सोशल मीडियावर सक्रीय आहे आणि ती या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असते. नुकतेच तिने इंस्टाग्रामवर फोटो शेअर केले आहेत. तिने फोटो शेअर करत लिहिले की, जेव्हा तुमच्या आतील गोष्टी बदलतील, तशा आजूबाजूच्या गोष्टीदेखील बदलतात.

या फोटोत तिचा नवा हेअरकट पहायला मिळतो आहे. तिच्या या लूकला पसंती मिळते आहे. तिच्या या पोस्टवर कमेंट्सचा वर्षाव होताना दिसत आहे.

आई कुठे काय करते मालिकेत नुकतेच गौरी आणि यशचा साखरपुडा होतो. त्यावेळी सर्व कुटुंब एकत्र येतात आणि डान्स करतात. अरूंधतीची इच्छा असते की ती घरात असे पर्यंत गौरी आणि यशचा साखरपुडा पार पडावा. तो साखरपुडा दिमाखात पार पडतो. मा्त्र आता अखेर अनिरुद्ध आणि अरूंधती घटस्फोट घेताना दिसणार आहेत.

अरुंधतीच्या घरातून जाण्यामुळे घरातील सर्व जण दुःखी आहेत. त्यामुळे पुढे मालिकेत काय घडणार हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.  

टॅग्स :आई कुठे काय करते मालिका