Join us

ठिपक्यांची रांगोळी मधील हे कलाकार आहेत रिअल लाईफमध्ये पती-पत्नी, जाणून घ्या त्यांच्याविषयी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2022 12:11 IST

मराठी चित्रपट आणि मालिका विश्वास देखील अशा अनेक जोड्या आहेत की जे खऱ्या आयुष्यातही पती-पत्नी आहेत.

छोट्या पडद्यावर सुरु झालेली मालिका म्हणजे 'ठिपक्यांची रांगोळी'. कानिटकर कुटुंबाची कथा सांगणारी ही मालिका अल्पावधीत लोकप्रिय झाली. या मालिकेत शरद पोंक्षे, अतुल तोडणकर,लीना भागवत अशी तगडी स्टारकास्ट असल्याचं पाहायला मिळत आहे. अप्पू आणि शशांकच्या लग्नानंतर रोज काही तरी नवीन ट्विस्ट मालिकेत येत आहे. 

अनेकांचे जोडीदार हे स्वतःही याच क्षेत्रातले आहेत. अभिनय क्षेत्रात  काम करणा-या पती-पत्नी कलाकारांच्या कितीतरी जोड्या आहेत.  मराठी चित्रपट आणि मालिका विश्वास देखील अशा अनेक जोड्या आहेत की जे खऱ्या आयुष्यातही पती-पत्नी आहेत. सध्या टीव्हीवर ठिपक्याची रांगोळी ही मालिका गाजत आहे.

या मालिकेत काम करणारी एक जोडी खर्‍या आयुष्यात देखील नवरा-बायको आहेत. आजवर आपण अशोक सराफ, निवेदिता सराफ,  सचिन पिळगावकर, सुप्रिया पिळगावकर हेदेखील पती-पत्नी असून रूपेरी पडद्यावर देखील या जोडीने अनेक चित्रपट आणि मालिकामध्ये देखील पती-पत्नीची भूमिका साकारली आहे.

ठिपक्यांची रांगोळी या मालिकेत असे दोन कलाकार आहेत जे मालिकेत  पती-पत्नीची भूमिका साकारत असून रिअल लाईफमध्येदेखील ते नवरा-बायको आहेत. हे कलाकार म्हणजे अभिनेत्री लीना भागवत कदम आणि अभिनेता मंगेश कदम. अभिनेत्री लीना आणि अभिनेता मंगेश कदम हे खऱ्या आयुष्यातही पती-पत्नी आहेत. अनेक नाटकांमध्ये  दोघांनी एकत्र काम केलं आहे. 

 

टॅग्स :टिव्ही कलाकारस्टार प्रवाह