Join us
Daily Top 2Weekly Top 5

'मन उडू उडू झालं' मालिकेतील दीपूची बहीण शलाका आहे सिनेसृष्टीतील या प्रसिद्ध अभिनेत्रीची लेक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2022 07:00 IST

मन उडू उडू झालंमधील शलाकाने आईच्या पावलावर पाऊल ठेवत मराठी कलाविश्वात पदार्पण केलं.

छोट्या पडद्यावर गाजत असलेली मालिका म्हणजे मन उडू उडू झालं  (Man Udu Udu Zhala). आतापर्यंत या मालिकेचे अनेक भाग झाले असून प्रत्येक भागात एक नवी कथा प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. सध्या या मालिकेत सानिका आणि कार्तिक यांनी केलेल्या लग्नामुळे इंद्रा आणि दिपू यांच्या नात्यावर परिणाम होताना दिसत आहे. दरम्यान मालिकेतील कलाकार देखील प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेत आहेत. अशीच एक व्यक्तिरेखा म्हणजे दिपूची मोठी बहीण शलाकाची. शलाकाच्या भूमिकेला प्रेक्षकांची चांगली पसंती देखील मिळतेय.  शलाकाची भूमिका अभिनेत्री शर्वरी कुलकर्णी साकारतेय. शर्वरी एक प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीची मुलगी आहे.

शर्वरी आईच्या पावलावर पाऊल ठेवत मालिका विश्वामध्ये पदार्पण केलं. शर्वरी कुलकर्णी ही मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री संपदा कुलकर्णीची मुलगी आहे. संपदा कुलकर्णी या मराठी चित्रपट, मालिका तसेच नाट्य अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. अनेक मंचावरून तिने सुत्रसंचालिकेची भूमिका देखील बजावली आहे.

 

शर्वरी कुलकर्णीने या मालिकेआधी सोनी मराठी वाहिनीवरील ‘आनंदी हे जग सारे’ या मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केले होते. यात तिने मीराची भूमिका साकारली होती. 

शर्वरी उत्तम डान्सर असून अभिनयाचे तिने धडे गिरवले आहेत. नाटकांमधूनही ती याआधी प्रेक्षकांसमोर आली आहे. २१ फेब्रुवारी २०२१ रोजी विभव बोरकर याच्यासोबत लग्न केले आहे. 

टॅग्स :संपदा जोगळेकरसेलिब्रिटीझी मराठी