Join us

धर्मेशने केले अफवांचे खंडन

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2017 17:53 IST

डान्स प्लस या रिअॅलिटी शोचे तिसरे पर्व लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हे पर्व पूर्वीपेक्षा अधिक भव्य असणार आहे. ...

डान्स प्लस या रिअॅलिटी शोचे तिसरे पर्व लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हे पर्व पूर्वीपेक्षा अधिक भव्य असणार आहे. या रिअॅलिटी शोच्या दुसऱ्या पर्वात परीक्षक म्हणून शक्ती मोहन, पुनीत पाठक आणि धर्मेश येलांडे यांनी जबाबदारी पार पाडली होती. पण अलीकडेच धर्मेशच्या जागी सलमानला नव्या नृत्यदिग्दर्शकाला घेण्यात येईल, अशी चर्चा सुरू होती. धर्मेशने असहकार्य करण्यास आणि नखरे दाखविण्यास प्रारंभ केल्यामुळे त्याच्या जागी सलमान युसुफ खानला घेतले जाणार आहे, असे सांगितले जात होते.परंतु आता धर्मेश येलांडेने स्वत:च या अफवांचे खंडन केले असून या कार्यक्रमाच्या तिसऱ्या पर्वासाठी चित्रीकरणालाही सुरुवात करण्यात आली आहे. तसेच यंदाही आपल्या स्पर्धकांद्वारे ही स्पर्धा जिंकून हॅटट्रिक करण्याची इच्छाही त्याने व्यक्त केली. धर्मेश सांगतो, “या अफवा कशा तयार झाल्या, ते मला ठाऊक नाही. ‘डान्स प्लस’ हा शो मला फार आवडतो आणि तिचे दोन्ही पर्व माझीचे टीम जिंकली आहे. मी आता या कार्यक्रमाच्या तिसऱ्य़ा पर्वातही सहभागी असून त्यासाठी मी चित्रीकरणासही प्रारंभ केला आहे. माझ्या टीममधील स्पर्धकांना मी प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली असून यंदाचे पर्वही जिंकण्याचा माझा प्रयत्न आहे. मी जर नखरे करत असतो, तर निर्मात्यांनी मला या तिसऱ्या पर्वासाठी करारबध्द केलं नसतं.”सुपरजज्ज रेमोने ही आपल्या या कॅप्टनची बाजू घेतली आहे. रेमो म्हणाला, “या साऱ्या अफवा आहेत. या कार्यक्रमाच्या पहिल्या पर्वापासून धर्मेश आमच्याबरोबर असून त्याच्याशिवाय या कार्यक्रमाचे तिसरे पर्व आम्ही केले नसते. तो आमच्यासोबत असून त्याचं चित्रीकरणही सुरू आहे, असे रेमो म्हणाला.