Join us
Daily Top 2Weekly Top 5

डॉक्टरने डिंपलसोबत केली हातमिळवणी, 'देवमाणूस' मालिकेत येणार नवं वळण

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2022 16:12 IST

‘देवमाणूस’ (Devmanus) या मालिकेने टीव्हीवर नुसता धुमाकूळ घातला होता. ही मालिका तुफान गाजली होती. मालिकेची प्रचंड लोकप्रियता पाहूनच, या मालिकेचा दुसरा सीझन आणण्याचा निर्णय निर्मात्यांनी घेतला होता.

Devmanus 2 : ‘देवमाणूस’ (Devmanus) या मालिकेने टीव्हीवर नुसता धुमाकूळ घातला होता. ही मालिका तुफान गाजली होती. मालिकेची प्रचंड लोकप्रियता पाहूनच, या मालिकेचा दुसरा सीझन आणण्याचा निर्णय निर्मात्यांनी घेतला होता. त्यानुसार,‘देवमाणूस 2’ (Devmanus 2 ) प्रेक्षकांच्या भेटीस आली. पहिल्या सीननप्रमाणेच मालिकेच्या या दुसऱ्या सीझनलाही सुरूवातीला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला.या मालिकेतील विलक्षण वळण प्रेक्षकांना आश्चर्यचकित करतात. नुकतंच प्रेक्षकांनी मालिकेत पाहिलं कि डॉक्टरने डिंपलसोबत हातमिळवणी केली आहे. आता हे दोघे मिळून डाव आखणार इतक्यातच समोरून मालिकेत एक नवीन चेहऱ्याची एंट्री झालेली प्रेक्षकांना पाहायला मिळाली.  

सोनाली या नवीन भूमिकेची ओळख नुकतीच मालिकेत प्रेक्षकांना झाली. सोनाली हि डॉक्टरांकडे तिच्या जमिनीच्या निमित्ताने मदत मागायला येते. समोरून मदत मागायला आलेल्या सोनालीला मदत करायची संधी डॉक्टर हातातून कशी निसटू देतील. आता तर डॉक्टर आणि डिंपल एकत्र आले आहेत त्यामुळे आता मालिकेत काहीतरी इंटरेस्टिंग घडामोडी होणार हे मात्र नक्की.

देवमाणूस ही झी मराठी वाहिनीवर प्रसारित होत असलेली, सत्यघटनेवर आधारित मालिका आहे. या मालिकेत किरण गायकवाड, अस्मिता देशमुख, रुक्मिणी सुतार, अंजली जोगळेकर, विरल माने, अंकुश दांडेकर आणि किरण डांगे हे महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.

टॅग्स :'देवमाणूस २' मालिकाटिव्ही कलाकार