'कुछ रंग प्यार के ऐसे भी' म्हणत मोठ्या तपश्चर्यनंतर देव -सोनाक्षी लग्नगाठीत अडकले. गुण्या गोविंदाने त्यांनी त्यांच्या संसाराला सुरूवात केली. सध्या मालिकेत सोनाक्षी-देव यांचा रोमाँटिक अंदाज पाहायला मिळतोय. मात्र हे प्रेम जास्त काळ टिकणार नसल्याचे कळतेय. होय, नव्याचे नऊ दिवस म्हणतात त्याप्रमाणेच देव आणि सोनाक्षीचे हे नातेही संपुष्टात येणार असल्याची माहिती मिळतेय. लवकरच ही मालिका नव्या वळणार पोहोचणार असून यात देव- सोनाक्षी घटस्फोट घेणार असल्याचे दाखवण्यात येणार आहे. या दोघांचा नेमका घटस्फोट कोणत्या गोष्टींमुळे होतो हे येणा-या भागात स्पष्ट होईल.देव-सोनाक्षी दोघांनाही लग्नगाठीत अडकण्यासाठी ब-याच समस्यांना सामोरे जावे लागल्याचे पाहायला मिळाले. त्यात देवच्या विचित्र वागण्यामुळे सोनाक्षीचा साखरपुडला मोडला जातो. असा एक व्टीस्ट पाहायला मिळाला होता. आता पुन्हा एकदा तोच ट्रॅक मालिकेच्या टीमने सोनाक्षीच्या आयुष्यात आणण्यात असल्याचे कळतेय.आता तर थेट लग्नमोडल्याचा ट्रॅक पाहायला मिळेल. देव आणि सोनाक्षी एकमेकांपासून दूर राहू शकत नाहीत. दोघांनीही आपल्या मनाविरोधात जाऊन दुस-या व्यक्तीसह संसार थाटण्याचे ठरवले असले तरी दोघेही आपले प्रेम विसरु शकत नव्हते. त्यामुळेच दोघेही एकमेंकापासून फार काळ लांब राहणे शक्य नसल्याचे कळताच देवची आई ईश्वरीने देवचे सोनाक्षीसह लग्न लावून दिले. आता कुठे तरी देव-सोनाक्षीच्या संसाराला सुरुवात झाली होती. दोघांची केमिस्ट्रीही प्रेक्षकांना आवडत असताना पुन्हा एकाद दोघांची केमिस्ट्री काही वेळे तरी पाहता येणार नाही.
देव - सोनाक्षी काडीमोड घेणार ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2016 13:30 IST