सारेगमपा या कार्यक्रमाचा विजेता कौशल पॉल हृतिक रोशनचा खूप मोठा फॅन आहे. त्याला एकदा तरी भेटता यावे अशी इच्छा त्याने अनेकवेळा त्याच्या मुलाखतीत व्यक्त केली आहे. कौशल पॉलची ही इच्छा नुकतीच हृतिकने पूर्ण केली आहे. कौशल हा हृतिकचा फॅन असल्याचे हृतिकला कळल्यानंतर हृतिकने त्याला काबिल या त्याच्या चित्रपटाच्या सेटवर बोलावून घेतले. हृतिकने भेटायला बोलावल्यावर काय करू आणि काय नाही अशी त्याची अवस्था झाली होती. कौशल सांगतो, "मी हृतिकच्या व्हॅनिटी व्हॅनमध्ये बसून त्याच्याशी खूप गप्पा मारल्या. त्याने माझी रेकॉर्ड केलेली काही गाणीदेखील ऐकली. त्याला भेटल्यावर मी पाहिलेले अनेक वर्षांपासूनचे स्वप्न पूर्ण झाल्याची मला जाणीव झाली."
कौशलची इच्छा झाली पूर्ण
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2016 18:04 IST