Join us
Daily Top 2Weekly Top 5

डिंपी रोहितच्या प्रेमात !

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2016 13:53 IST

 राहुल महाजन याच्याबरोबर घटस्फोट झाल्यानंतर डिंपी गांगुली पुन्हा विवाहबंधनात अडकणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. गेल्या दोन वषार्पासून डिंपी आणि ...

 राहुल महाजन याच्याबरोबर घटस्फोट झाल्यानंतर डिंपी गांगुली पुन्हा विवाहबंधनात अडकणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. गेल्या दोन वषार्पासून डिंपी आणि रोहित यांच्यात काहीतरी चालू असल्याची चर्चा होती. डिंपीने नुकतेच सोशल मीडियावर फोटो टाकले असून त्यात रोहितने डिंपीला अंगठी घातल्याचे छायाचित्र दिसत आहे. यात डिंपीने लिहिले आहे की, ''रोहितने मला लग्नासाठी विचारले आणि मी त्याला लगेचच हो म्हटले.'' या दोघांचे जवळचे नातेवाईक आणि मित्र-मैत्रिणींच्या उपस्थितीतीत येत्या २७ नोव्हेंबरला कोलकत्यामध्ये डिंपी व रोहित लग्नाच्या बंधनात अडकणार आहेत. डिंपीचा जवळचा मित्र सुशांत दिवगीकर म्हणाला, हो डिंपीचा साखरपुडा झाला आहे. रोहित हा खूप चांगला मुलगा असून ते दोघे एकमेकांना पसंत करतात. तिच्या लग्नासाठी माझ्याकडे एक सिक्रेट गिफ्ट आहे. ते मी तिला तिच्या लग्नात देणार आहे.