Join us  

'डान्स+4'च्या मंचावर सादर होणार दीपवीरची प्रेमकथा!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2018 7:15 AM

बॉलीवूडचा अभिनेता रणवीर सिंह आणि अभिनेत्री दीपिका पादुकोण यांचा विवाह ही 2018 मधील सर्वाधिक चर्चेची गोष्ट ठरली. ‘डान्स+4’च्या मंचावर लवकरच त्यांची प्रेमकथा सादर करण्यात येणार आहे.

ठळक मुद्दे‘डान्स+4’च्या मंचावर लवकरच दीपवीरची प्रेमकथा सादर करण्यात येणार आहे.

बॉलीवूडचा अभिनेता रणवीर सिंह आणि अभिनेत्री दीपिका पादुकोण यांचा विवाह हा 2018 मधील सर्वाधिक चर्चेची गोष्ट ठरली. ‘डान्स+4’च्या मंचावर लवकरच त्यांची प्रेमकथा सादर करण्यात येणार आहे. या कार्यक्रमातील स्पर्धक ऋषभ, वर्तिका, सुजन आणि आँचल या स्पर्धकांनी आपल्या नृत्यशैलीतून दीप-वीर यांची प्रेमकथा मंचावर साकारली. ‘राम-लीला’ चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान या दोघांमध्ये प्रेमाचा अंकुर उमलला आणि नंतरची सहा वर्षे त्यांचे प्रेम बहरत गेले.  नोव्हेंबरमध्ये इटलीतील ‘लेक कामो मध्ये दोघे विवाहबंधनात अडकले. त्यांची ही प्रेमकथा या कार्यक्रमातील स्पर्धकांनी तातड-तातड, नागदा संग ढोल बाजे, लहू मूँह लग गया, अंग लगा दे रे या गाण्याच्या माध्यमातून मांडण्यात आली. 

या स्पर्धकांची नृत्ये पाहून रणवीर सिंह अतिशय आनंदित झाला. इतका की त्यांचे नृत्य संपल्यावर त्याने व्यासपीठावर धाव घेतली आणि सर्व स्पर्धकांना आलिंगन दिले. ही आपल्याला लग्नाची मिळालेली सर्वात सुंदर भेट असल्याचे सांगून तो म्हणाला, “माझं लग्न हे माझ्यासाठी जणू एक सुखद स्वप्नच होतं आणि हे सर्व माझ्या सुंदर पत्नीमुळेच शक्य झालं.” सुपरजज्ज रेमोने त्याला विचारले की त्याचे वैवाहिक जीवन कसे चालले आहे, तेव्हा रणवीर म्हणाला, “आमच्या लग्नालाअजून दहाच दिवस झाले आहेत, पण अजून सगळ सुखद सुरु आहे.”

टॅग्स :डान्स प्लस 4रणवीर सिंगदीप- वीरदीपिका पादुकोण