Join us
Daily Top 2Weekly Top 5

‘रंग माझा वेगळा’ मालिकेत रंगणार दीपाच्या डोहाळ जेवणाचा कार्यक्रम

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2021 12:53 IST

स्त्री ही क्षणाची पत्नी आणि अनंत काळची माता असते असं म्हणतात

स्टार प्रवाहवरील ‘रंग माझा वेगळा’ मालिकेत लवकरच दीपाच्या डोहाळजेवणाचा कार्यक्रम पाहायला मिळणार आहे. स्त्री ही क्षणाची पत्नी आणि अनंत काळची माता असते असं म्हणतात. मातृत्वासारखं दुसरं सुख नाही. दीपाला लहानपणापासूनच आईचं प्रेम मिळालं नाही. त्यामुळे राधाईला आई मानत तिने ते प्रेम मिळवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर कार्तिक तिच्या आयुष्यात आला आणि सर्वस्व झाला. अशक्य वाटत असणारी प्रत्येक गोष्ट शक्य होत गेली. आता तर दीपाला मातृत्वाचं सुखही मिळणार आहे. मात्र आनंदाच्या या काळात दीपाला कार्तिकची साथ मिळत नाहीय. कार्तिकच्या विचित्र वागण्यामुळे दीपा सध्या प्रचंड तणावात आहे. त्यामुळे डोहाळ जेवणाचा कार्यक्रमात नेमकं काय नाट्य घडणार याची उत्सुकता आहे.

डोहाळ जेवणाच्या या कार्यक्रमासाठी इनामदार कुटुंबात मात्र जय्यत तयारी करण्यात आली आहे. हिरवी साडी आणि पारंपरिक फुलांच्या दागिन्यांमध्ये दीपाचं सौंदर्य आणखीनच खुलून आलं आहे. तेव्हा रंग माझा वेगळा मालिकेतलं हे नवं वळण पहायला मिळेल. 

टॅग्स :स्टार प्रवाह