Join us
Daily Top 2Weekly Top 5

डान्स का नया तेवरमध्ये परीक्षकाच्या भूमिकेत दिसणार डॅना अॅलेक्सा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2018 15:03 IST

लवकरच येत आहे नवा डान्स रिअॅलिटी शो हाय फीवर. डान्स का नया तेवर! या शोने आतापासूनच इंडस्ट्रीमध्ये चर्चेला उधाण ...

लवकरच येत आहे नवा डान्स रिअॅलिटी शो हाय फीवर. डान्स का नया तेवर! या शोने आतापासूनच इंडस्ट्रीमध्ये चर्चेला उधाण आणले आहे. कारण, या कार्यक्रमात परीक्षकांच्या भूमिकेत निर्मात्यांनी अनेक प्रसिद्ध व्यक्तींना आणले आहे. ग्लॅमरस दिवा लारा दत्तापासून नृत्याची तांत्रिक जाण असलेले ख्यातनाम अहमद खान अशा सर्वोत्तम व्यक्ती या शोमध्ये आहेत आणि आता आंतरराष्ट्रीय नृत्यदिग्दर्शक डॅना अॅलेक्सा या कार्यक्रमाच्या माध्यमातून भारतीय टीव्हीवर पदार्पण करणार असल्याची चर्चा आमच्या कानावर आली आहे. हाय फीवर डान्स का नया तेवर या कार्यक्रमात देशभरातील जोड्या नाचणार आहेत. अशा जोड्या ज्यांना रंगमंचावर फक्त त्यांचं नृत्य कौशल्यच नाही तर त्यांच्या नात्याचे बंधही दाखवायचे आहेत.

डॅना अॅलेक्सा या व्यावसायिक नर्तक आणि नृत्यदिग्दर्शिका आहेत. हिप हॉप, जॅझ, स्ट्रीट जॅझ, टॅप आणि बॅलेट अशा विविध नृत्यप्रकारांचे प्रशिक्षण त्यांनी जगातील सर्वोत्तम गुरुंकडून घेतले आहे.  आयडीए हॉलिवुडमध्ये कायमस्वरुपी शिकवणी वेळ असलेल्या डॅना यांनी नृत्य शिकवण्यासाठी जगभर भ्रंमती केली आहे. ब्रावो टीव्हीवरील वॉच वॉट हॅपन्स लाइव्ह आणि द रीअल हाऊसवाइफ ऑफ एनजेमध्ये नृत्यदिग्दर्शन केलेल्या आणि परफॉर्म केलेल्या तसेच टॅगा आणि विझ खलिफासारख्या कलाकारांसोबत काम केलेल्या डॅना आता या कार्यक्रमातील जोड्यांचे तेवर पाहणार आहेत. स्पर्धकांच्या नृत्यातील तांत्रिकतेमध्ये सखोल लक्ष घालण्याबरोबरच त्या आपल्या आंतरराष्ट्रीय नृत्यानुभवांच्या आधारे स्पर्धकांना मार्गदर्शनही करतील. याबद्दल विचारले असता डॅना म्हणाली, भारताच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचे मला नेहमीच कौतुक वाटले आहे. इथल्या ऊर्जेतूनच लक्षात येते की कसा प्रत्येक जण दुसऱ्याशी भावनिकरित्या घट्ट जोडला गेला आहे. नृत्याच्या माध्यमातून या भावना जिवंत होताना पाहणे फारच छान असेल. डान्स फक्त आवड नाही, ते माझे जीवन आहे. मी जगभरात फिरलेय, जगभरातील लोकांना प्रशिक्षण दिले आहे. पण, हाय फीवर... डान्स का नया तेवर या कार्यक्रमातून भारतीय टेलिव्हिजनवर पदार्पण करण्यास मी फारच उत्सुक आहे. आंतरराष्ट्रीय डान्समधील माझ्या अनुभवांतून मी एक नवा दृष्टिकोन देऊ शकेन, अशी मला आशा आहे. या देशात प्रचंड प्रतिभा आहे आणि या प्रवासाचा भाग होण्यास मी उत्सुक आहे.