Join us
Daily Top 2Weekly Top 5

दलजित म्हणते, पती करतोय छळ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2016 13:55 IST

'नच बलिये' स्टार दलजित कौरने तिचा पती छळ करीत असल्याचा आरोप लावला आहे. पती शालीन भानोत हा तिचा मुलाचा ...

'नच बलिये' स्टार दलजित कौरने तिचा पती छळ करीत असल्याचा आरोप लावला आहे. पती शालीन भानोत हा तिचा मुलाचा छळ करीत असल्याची तक्रार तिने पोलिसात दाखल केली आहे. सहा वर्षांपूर्वी दलजित आणि शालीनचा विवाह झाला. २७ एप्रिलला तिने याबाबत रितसर तक्रार दाखल केली. हुंड्यासाठीही आपला छळ होत असल्याचे तिने या तक्रारीत म्हटले आहे. अंधेरीतील कोर्टात तिने वकील श्रेया श्रीवास्तव यांच्यामार्फत हा तक्रार अर्ज दाखल केला आहे. दलजीतने सांगितले, की तिची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची झाली असून मुलाचा खर्च कसा करावा हा प्रश्न तिच्यासमोर उपस्थित झाला आहे. जेव्हा मी प्रेग्नेंट होते, तेव्हा शालीनने माझी मुळीच काळजी घेतली नाही. याकाळात मला अस्थमाचा अटॅक आला होता, मात्र शालीन मला डॉक्टरांकडे घेऊन गेला नाही. शालीनने माझी सिझेरियन डिलिव्हरी करायलाही नकार दिला होता. त्याच्या मते मला काहीच त्रास नव्हता आणि मी त्यावेळी नाटकं करत होती. त्याचे दुसर्‍या स्त्रीसोबत संबंध असल्याचे माझ्या लक्षात आले. एकदा तर त्याने माझ्या वडिलांसमोरच मला मारहाण केली.