Join us
Daily Top 2Weekly Top 5

cuteness overloaded!टीव्ही कलाकार करणवीर बोहराने मुलींसह केले फोटोशूट

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2017 12:10 IST

.काही दिवसांपूर्वी करण मुलींना 'नागीण-2'च्या सेटवर घेऊन गेला होता. सेटवर क्युट मुलींना पाहताच इतर कलाकरांनाही या मुलींसह धमाल केली होती.

बॉलिवूड कलाकार असो किंवा टीव्ही कलाकार आपले ग्लॅमरस फोटोशूट करत सोशल मीडियावर शेअर करत असतात आता टीव्ही कलाकार करणवीर बोहरानेही एक छानसे फोटोशूट केले आहे. विशेष म्हणजे त्याने त्याच्या जुळ्या मुलींसह खास फोटोशूट केले आहे. मीकू आणि नोनू अशी त्याच्या मुलांची नाव आहेत.त्याने त्याच्या मुलांसह केले हे फोटोशूट सोशल मीडियावर अपडेट करताच त्याला खूप चांगल्या प्रतिक्रीया मिळतात. खरेतर करणवीरने त्याच्या मुलींसह पहिल्यांदाच फोटोशूट केले आहे. करणवीरची पत्नी टीजे सिद्धूने गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये या गोड मुलींना जन्म दिला होता.त्यानंतर टीजे मुलींसह 6 महिने लंडनमध्येच राहिली आता ती मुलींसह मुंबईत आली आहे.काही दिवसांपूर्वी करण मुलींना 'नागीण-2'च्या सेटवर घेऊन गेला होता. सेटवर क्युट मुलींना पाहताच इतर कलाकरांनाही या मुलींसह धमाल केली होती. या मुली सेटवर येताच सा-यांनी थोडा वेळ मस्त मजेत घालवला.मालिकेत मुख्य भूमिका साकारत असलेली मौनी रॉयनेही करनच्या मुलींबरोबर मजा मस्तीचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. तसेच मालिकतले कलाकार  अदा खान, सुधा चंद्रन हे या मुलींना खास भेटण्यासाठी करणच्या घरी अधूमधून जात असतात. त्यामुळे या कलाकारांना या दोन्ही बाळांचा खूप लळा लागल्याचेही हे कलाकार सांगतात.मुलींचा जन्म झाल्यानंतर करणवीरने त्याच्या मुलींचा एक क्युट फोटो शेअर केला होता. त्यानंतर आता 6 महिन्यानंतर त्याने हे खास फोटोशूट केले आहे. करणवीर आणि टीजे यांच्या लग्नाला आता 11 वर्ष झाली आहे. सध्या करणवीर बोहरा 'नागिन 2' मालिकेत झळकत असून तो मालिकेत साकारत असलेली भूमिकाही रसिकांच्या पसंतीस उतरत आहे.