Join us
Daily Top 2Weekly Top 5

ऑलमोस्ट सुफळ संपूर्णच्या सेटवर भुट्टा पार्टी व्हिडिओ viral

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2021 14:38 IST

शूटिंगच्यामध्ये चमचमीत-चटकदार भुट्ट्याचा आस्वाद घेण्याची मजाच काही वेगळी आहे आणि या भुट्ट्यावर ताव मारतानाचा एक झकास फोटो नचिकेत म्हणजेच अभिनेता निखिल दामले याने सोशल मीडियावर शेअर केला आहे

छोट्या पडद्यावरील विविध मालिकांमध्ये काम करणा-या कलाकारांचं शेड्युल भलतंच बिझी असतं. दिवसाचे १७ ते १८ तासांचं शुटिंग यामुळे त्यांचा बराच वेळ हा मालिकांच्या सेटवरच जातो. या सगळ्या गोष्टींमुळे मालिकांमध्ये काम करणा-या कलाकारांसाठी मालिकेचा सेट जणू दुसरं घर आणि मालिकेतील कलाकार मिळून एक नवं कुटुंब बनतं. मालिकेतील कलाकारांमध्ये काम करता करता एक जिव्हाळ्याचं नातं निर्माण होतं. सेटवरच विविध सणांचे सेलिब्रेशन आणि वाढदिवस साजरे होतात. परिणामी मालिकेतील या कलाकारांमध्ये प्रेमाचे आणि आपुलकीचे बंध निर्माण होतात.

लोकप्रिय मालिका ऑलमोस्ट सुफळ संपूर्णने नुकताच ४०० भागांचा टप्पा गाठला. प्रेक्षकांचं प्रेम आणि पाठिंब्यामुळे या मालिकेने लोकप्रियतेचं शिखर गाठलं. या मालिकेतील प्रमुख भूमिका साकारणारे कलाकार प्रेक्षकांच्या मनात घर करून बसले आहेत. त्यामुळे त्यांना मालिकेप्रमाणेच वैयक्तिक स्तरावर देखील प्रेक्षक आणि चाहत्यांकडून तितकीच पसंती मिळतेय. सोशल मीडियावर देखील त्यांचा खूप मोठा चाहता वर्ग आहे.

हे कलाकार ऑन-स्क्रीन तसेच ऑफस्क्रीन देखील धमाल करत असतात. नुकताच या मालिकेच्या सेटवर कलाकारांनी भुट्टा पार्टी केली. कलाकार आणि संपूर्ण टीम गरमागरम भुट्ट्यावर ताव मारताना दिसली. 

शूटिंगच्यामध्ये चमचमीत-चटकदार भुट्ट्याचा आस्वाद घेण्याची मजाच काही वेगळी आहे आणि या भुट्ट्यावर ताव मारतानाचा एक झकास फोटो नचिकेत म्हणजेच अभिनेता निखिल दामले याने सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यांच्या या भुट्टा पार्टीला प्रेक्षकांनी देखील सोशल मीडियावर भरघोस पसंती दिली आहे.