Join us
Daily Top 2Weekly Top 5

सरस्वती मालिकेचे ३०० एपिसोड पूर्ण

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2016 17:14 IST

 सरस्वती या मालिकेने कमी कालावधीत प्रेक्षकांच्या मनावर आधिराज्य केले आहे. या मालिकेतील प्रत्येक पात्रावर प्रेक्षकांनी भरभरून पसंती दिली असल्याचे ...

 सरस्वती या मालिकेने कमी कालावधीत प्रेक्षकांच्या मनावर आधिराज्य केले आहे. या मालिकेतील प्रत्येक पात्रावर प्रेक्षकांनी भरभरून पसंती दिली असल्याचे पाहायला मिळत आहे. म्हणूनच या मालिकेने आता  ३०० एपिसोड पूर्ण केले आहे. सध्या माराठीमध्ये विविध विषयांच्या नव्या मालिकांची सुरू असल्या तरी स्त्री प्रधान मालिका नेहमीच येत असतात. अशीच प्रेमळ, मनमिळावू, बिनधास्त आणि स्वच्छंदपणे आयुष्य जगणारी सरस्वती या मालिकेने सध्या प्रेक्षकांना आपलेसे केले आहे.  या मालिकेचे दिग्दर्शन मंगेश कंथाळे यांनी केले आहेत. तर या मालिकेचे लेखक चिन्मय मांडलेकर आहेत. तितिक्षा तावडे, आस्ताद काळे, संग्राम साळवी, माधव देवचक्के, सिध्देश्वर झडबुके, सुलेखा तळवळकर, पूजा नाईक, रसिक राज आणि सुनिल बर्वे या कलाकारांचा समावेश आहे. या मालिकेतील सर्वच कलाकारांनी ३०० एपिसोड पूर्ण झाल्यामुळे मोठया उत्साहात सेटवर केक कापला आहे. त्याचप्रमाणे या मालिकेतील सर्वच कलाकरांनी लय भारी फोटोसेशन केले असल्याचे पाहायला मिळत आहेत. कलाकारांनी सेल्फी, पाउट अशा विविध पोझ देऊन मालिकेच्या ३०० एपिसोड पूर्ण झाल्याचा आनंद व्यक्त केला आहे. प्रेक्षकाांचा लाडका अभिनेता संग्राम साळवीदेखील मालिकेत सध्या दिसत नसला तरी मालिकेच्या या आनंदात सहभागी झाला होता. त्यानेदेखील फोटोमध्ये मस्तपैकी पाउट पोझ दिली असल्याचे दिसत आहे. सध्या सग्रांम पुन्हा मालिकेत कधी परतणार आहे या प्रतिक्षेत त्याचे सर्व चाहते दिसत आहेत. तसेच त्याला सोशल मीडियावरदेखील कधी परतणार असेदेखील विचारण्यात येत आहे. मात्र सरस्वती मालिकेचे हे यश नक्कीच कौतुकास्पद आहे.