Join us

​दीपशिखाची घटस्फोटित पतीविरोधात पोलिसात तक्रार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2016 18:23 IST

टीव्ही नायिका आणि ‘बिग बॉस ८’ची स्पर्धक दीपशिखा नागपालने घटस्फोटित पती केशव अरोराविरोधात मुंबईतील बंगुर नगर पोलिस स्टेशनमध्ये घरगुती ...

टीव्ही नायिका आणि ‘बिग बॉस ८’ची स्पर्धक दीपशिखा नागपालने घटस्फोटित पती केशव अरोराविरोधात मुंबईतील बंगुर नगर पोलिस स्टेशनमध्ये घरगुती हिंसाचाराची तक्रार दाखल केली आहे. दीपशिखाच्या आरोपानुसार, ‘केशव अरोरा घरात आला आणि पैशांची मागणी करू  लागला. पैसे देण्यास नकार केल्याने मला बेदम मारहाण केली. यामध्ये माझ्या नाकातून रक्त वाहू लागले आणि शरीरावर जख्मा झाल्या आहेत. ‘या घटनेनंतर मला धक्का बसला. तो एक पुरूष आहे आणि काहीही केलं तर बचावेल, असं त्याला वाटलं. पण मी रडणार नाही तर त्याच्या प्रत्येक कृत्याचं धडा त्याला शिकविणारच’ असं दीपशिखा म्हणाली.