Join us

​रवीना टंडन झळकणार चला हवा येऊ द्यामध्ये

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2017 16:23 IST

चला हवा येऊ द्या हा कार्यक्रम मराठी इंडस्ट्रीतील सगळ्याच सेलिब्रेटींचा आवडता कार्यक्रम आहे. या कार्यक्रमात हजेरी लावायला मिळावी अशी ...

चला हवा येऊ द्या हा कार्यक्रम मराठी इंडस्ट्रीतील सगळ्याच सेलिब्रेटींचा आवडता कार्यक्रम आहे. या कार्यक्रमात हजेरी लावायला मिळावी अशी अनेक कलाकारांची इच्छा असते. पण आता मराठीप्रमाणे हिंदी कलाकारांचादेखील हा कार्यक्रम आवडता  बनला आहे असे म्हटले तर ते चुकीचे ठरणार नाही. कारण सलमान खान, आमिर खान, शाहरुख खान, अक्षय कुमार, गोविंदा, काजोल, अजय देवगण, विद्या बालन, जॉन अब्राहम, सोनम कपूर अशा बॉलिवूडमधील अनेक दिग्गजांनी या कार्यक्रमात हजेरी लावली आहे आणि आता आणखी एक कलाकार या कार्यक्रमात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. रवीना टंडनच्या मातृ या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा आहे. या चित्रपटाद्वारे रवीना अनेक वर्षांनंतर बॉलिवूडमध्ये कमबॅक करत आहे. त्यामुळे या चित्रपटावर तिने खूपच मेहनत घेतली आहे. या चित्रपटाचे प्रमोशन करण्याची एकदेखील संधी ती सोडत नाहीये. अनेक रिअॅलिटी शोमध्ये ती सध्या या चित्रपटासाठी झळकत आहे. कोणत्याही चित्रपटाच्या प्रमोशनसाठी सध्या चला हवा येऊ द्या हा कार्यक्रम बॉलिवूडच्या कलाकारांचादेखील आवडता बनला असल्यामुळे रवीनादेखील या कार्यक्रमात झळकणार आहे. मातृ या आगामी चित्रपटाचे ती या कार्यक्रमात प्रमोशन करणार आहे. रवीना चला हवा येऊ द्या या कार्यक्रमात हजेरी लावणार असल्याचे तिने स्वतः तिच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या फॅन्सना सांगितले आहे. या कार्यक्रमाच्या सेटवरचा एक व्हिडिओ तिने फेसबुक या सोशल नेटवर्किंगवर पोस्ट केला असून मी या कार्यक्रमासाठी नुकतेच चित्रीकरण केले असे तिने म्हटले आहे. या तिच्या व्हिडिओला अनेक लाइक्स मिळत असून यावर अनेकजण कमेंट्स करत आहेत.