Join us

'चला हवा येऊ द्या' च्या मंचावर 'रंगून' सिनेमाच्या टीमने लावली हजेरी,‘लंडन ठुमकदा’वर थिरकली कंगना राणौत

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2017 14:29 IST

बॉलिवूडची क्वीन कंगना राणौत, सैफ अली खान आणि शाहिद कपूर यांचा रंगून सिनेमा रसिकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळेच सध्या ...

बॉलिवूडची क्वीन कंगना राणौत, सैफ अली खान आणि शाहिद कपूर यांचा रंगून सिनेमा रसिकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळेच सध्या जोरदार या सिनेमाचे प्रमोशन होतय. या सिनेमाच्या प्रमोशनसाठी कंगणा, सैफ आणि शाहिद सध्या विविध शोमध्ये हजेरी लावतायत. याच सिनेमाच्या प्रमोशनसाठी रंगूनची ही टीम पोहचली ती थुकरटवाडीत अर्थात चला हवा येऊ द्या या मराठमोळ्या शोमध्ये. मराठी शो म्हटल्यावर रंगून सिनेमाची टीम रसिकांशी मराठीत संवाद साधताना पाहायला मिळेल. या शोमध्ये रंगूनच्या कलाकारांनी थुकरटवाडीतल्या विनोदसम्राटांसोबत धम्माल मस्ती केली. यांत लक्षवेधी ठरली ती बॉलिवूडची क्वीन कंगणा राणौत. कंगणाने 'चला हवा येऊ द्या' या शोच्या मंचावर धम्माल मस्ती केली. पहिल्यांदाच कंगणाने एखाद्या मराठी कार्यक्रमात हजेरी लावत फुल ऑन मस्ती केली. विशेष म्हणजे श्रेया बुगडेसह बॉलिवूड क्वीन कंगणाने तिच्या सिनेमातल्या लंडन ठुमकदा गाण्यावर ताल धरत धमाकेदार नृत्य सादर केले. सध्या कंगणाच्या रंगून सिनेमाची जोरदार चर्चा सुरु आहे. या सिनेमात कंगणाचा लूक, तिचा डान्स सारं काही विशेष लक्ष वेधून घेत आहे. याच पार्श्वभूमीवर चला हवा येऊ द्यामध्ये तिने केलेली धम्माल रसिकांसाठी ट्रीट ठरणार आहे. कंगणासोबतच सैफ आणि शाहिद कपूर यांच्या भूमिकाही तितक्याच खास आहेत. विशाल भारद्वाज दिग्दर्शित हा सिनेमा लवकरच रसिकांच्या भेटीला येत आहे. मात्र या सिनेमाच्या निमित्ताने थुकरटवाडी रंगून सिनेमा आणि सिनेमाच्या कलाकारांमध्ये रंगून गेल्याचं पाहायला मिळाले. अशाप्रकारे चला हवा येऊ द्या या शोमध्ये बॉलिवूडच्या कलाकारांनी हजेरी लावण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. बॉलिवूडच्या दिग्गज कलाकारांनी आपापल्या सिनेमाच्या प्रमोशनसाठी शोवर हजेरी लावून मराठी रसिकांचं फुल ऑन मनोरंजन केले आहे. या मंचावर सलमान खान,शाहरूख खान, सोनम कपूर यासारख्या अनेक बॉलिवूडच्या कलाकारांनी हजेरी लावत त्यांचा मराठमोळा अंदाजही पाहायला मिळाला. मराठी भाषाही बोलता येत नसली तरीही या भाषेतला गोडवा समजून स्वत:ही खूप मजा मस्ती करताना दिसले. त्यामुळे बी-टाऊनची मंडळी या मराठमोळ्या अंदाजाच्या प्रेमात पडतायत.