Join us

'चला हवा येऊ द्या'च्या मंचावर आली 'तुझ्यात जीव रंगला'ची टीम

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2018 06:30 IST

कसे आहात मंडळी, हसताय ना, हसायलाच पाहिजे, असं म्हणत गेली चार वर्षे झी मराठी वाहिनीवरील ‘चला हवा येऊ द्या’ हा कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्र तसेच जगभरातील मराठी प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे.

ठळक मुद्देथुकरटवाडीत चक्क कोल्हापूरवरून पाहुणे येणार आहेत

कसे आहात मंडळी, हसताय ना, हसायलाच पाहिजे, असं म्हणत गेली चार वर्षे झी मराठी वाहिनीवरील ‘चला हवा येऊ द्या’ हा कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्र तसेच जगभरातील मराठी प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. प्रेक्षकांचे प्रेम आणि उत्तम प्रतिसादाने 'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमाने ४०० भागांचा यशस्वी पल्ला गाठला. आत्ता पर्यंतच्या प्रवासात चला हवा येऊ द्या मध्ये प्रेक्षकांनी महाराष्ट्र दौरा, भारत दौरा आणि विश्व दौरा यांचा मनमुराद आनंद लुटला. ४०० भागांनंतर आता या कार्यक्रमात नवीन काय असा प्रश्न सर्वांसमोर उपस्थित झाला असताना नुकतंच चला हवा येऊ द्या चे नवीन पर्व होउ दे व्हायरल प्रेक्षकांच्या भेटीस आले. या पर्वात तुमच्या आमच्या सारख्या सामान्य लोकांनी प्रेक्षकांना हसवण्याचा विडा उचलला आहे.

येत्या भागात थुकरटवाडीत चक्क कोल्हापूरवरून पाहुणे येणार आहेत. संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावणाऱ्या 'तुझ्यात जीव रंगला' या लोकप्रिय मालिकेचे कलाकार थुकरटवाडीच्या मंचावर सज्ज होणार आहे. राणा, अंजली, नंदिता वहिनी, सुरज, चंदा, लाडू, बरकत हे आणि मालिकेतील सर्व लोकप्रिय कलाकार थुकरटवाडीतील विनोदवीरांना भेटायला आले. आपले लाडके कलाकार मंचावर आल्यावर विनोदवीरांनी हास्यकल्लोळ केला. तुझ्यात जीव रंगला मालिकेचे विनोदी स्किट चला हवा येऊ द्याच्या विनोदवीरांनी सादर केले, ज्यात भाऊ राणा, श्रेया अंजली बाई आणि कुशल सखी बनून सर्वांना पोट धरून हसायला भाग पडणार आहेत.

टॅग्स :चला हवा येऊ द्यातुझ्यात जीव रंगला