'येऊ तशी कशी मी नांदायला' मालिकेतून अभिनेता शाल्व किंजवडेकर (Shalva Kinjavdekar) घराघरात लोकप्रिय झाला. सध्या तो शिवा मालिकेत काम करताना दिसतो आहे. दरम्यान आज शाल्वने गर्लफ्रेंड श्रेया डफळापुरकर(Shreya Daflapurkar)सोबत लग्नगाठ बांधली आहे. नुकतेच त्यांच्या लग्नाचा फोटो समोर आला आहे. या फोटोत शाल्व श्रेयाच्या गळात मंगळसूत्र घालताना दिसत आहे.
शाल्व किंजवडेकरने गर्लफ्रेंड श्रेया डफळापूरकरसोबत लग्नगाठ बांधली. त्यांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ समोर आले आहेत. मागील वर्षी शाल्व आणि श्रेयाचा साखरपुडा पार पडला होता. त्यांच्या साखरपुड्याला अनेक कलाकार मंडळींनी हजेरी लावली होती.
शाल्व किंजवडेकर आणि श्रेया डफळापूरकरच्या लग्नाला त्यांचे जवळचे मित्र सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकरने हजेरी लावली आहे. सिद्धार्थने त्या दोघांसोबतचे फोटो शेअर केले आहेत. त्यात ते दोघे लाल रंगाच्या गेटअपमध्ये दिसत आहे. त्यांच्या डोक्याला बाशिंगदेखील पाहायला मिळत आहे.
गेल्या काही वर्षांपासून शाल्व किंजवडेकर आणि श्रेया डफाळपूरकर रिलेशनशिपमध्ये आहेत. अनेकदा ते दोघे एकमेकांबरोबरचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत प्रेम व्यक्त करताना दिसतात. दरम्यान, सध्या शाल्व झी मराठीवरील 'शिवा' मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. तर श्रेया डफळापूरकर कॉश्च्युम डिझायनर आहे. 'स्टाईल बाय श्रेया' हा तिचा कपड्यांचा ब्रँड आहे. तिने अनेक सेलिब्रिटींसाठी कॉश्च्युन डिझाईन केला आहे.