Join us
Daily Top 2Weekly Top 5

मैत्री आणि प्रेम एकत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2016 00:17 IST

मराठी इंडस्ट्रीमधील पूजा सावंत व अमृता खानविलकर या दोघीं एकमेकींच्या बेस्ट फ्रेंड आहेत. तसेच या दोघींच्या आईदेखील एकमेकींच्या खास ...

मराठी इंडस्ट्रीमधील पूजा सावंत व अमृता खानविलकर या दोघीं एकमेकींच्या बेस्ट फ्रेंड आहेत. तसेच या दोघींच्या आईदेखील एकमेकींच्या खास मैत्रिणी आहेत. त्यामुळे या दोघींचे नाते अधिक खुलत चालले आहेत. नुकतेच आॅस्ट्रेलियाला या एकत्रित गेल्या होत्या त्यावेळी अमृताने टिविट केले होते की, पूजा माझी एखादया लहान बहिणींसारखी काळजी घेते. यावरून दिसून येते की,दोघींचे एक खास टयुनिंग जमले आहे. तसेच अभिजीत खांडकेकर आणि सुखदा खांडकेकर ही महाराष्ट्राची सुंदर जोडी सर्वानाच महित आहे. यांच्यातील नवरा-बायकोचे नाते हे एखादया मैत्रिसारखे आहे. मराठी इंडस्ट्रीच्या जोडयामध्ये अभिजीत व सुखदाचे नाव आवर्जुन घेतले जाते. अशाच या प्रेमळ जोडया एकत्रित आल्या आहेत. मैत्री आणि प्रेम यांच्या भावना या फोटोतून व्यक्त होतात. सकाळच्या शांत, फ्रेश वातावरणात या नात्यांना एक क्लिक करण्याचा मोह या कलाकारांना आवरला नाही.