Join us  

Swaran Ghar : अरे काय हे? मालिकेला हा ‘दुप्पटा सीन’पाहून प्रेक्षक कोमात, नेटकरी जोमात

By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2022 1:46 PM

Swaran Ghar Tv Serial : प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यासाठी मालिकांमध्ये रोज नवनवे ट्विस्ट आणले जातात. यापैकी काही ट्विस्ट मालिकेला खरोखर रंजक बनवतात. काही ट्विस्ट मात्र मालिकेचं पार हसं करणारे असतात.

मालिकांचा प्रेक्षकवर्ग मोठा आहे. त्यामुळेच छोट्या पडद्यावर नवनव्या मालिका येतात, गाजतात. प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यासाठी मालिकांमध्ये रोज नवनवे ट्विस्ट आणले जातात. यापैकी काही ट्विस्ट मालिकेला खरोखर रंजक बनवतात. काही ट्विस्ट मात्र मालिकेचं पार हसं करणारे असतात. आजच्या सोशल मीडियाच्या काळात यामुळेच अनेक मालिका ट्रोल होताना दिसतात. सध्या अशीच एक मालिका ट्रोल होतेय. या मलिकेतील एक सीन पाहून हसावं की रडावं तेच प्रेक्षकांना कळत नाहीये.

लॉजिक गहाण ठेवून शूट करण्यात आलेला या मालिकेचा सीन सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय आणि लोक मालिकेची खिल्ली उडवत आहेत. या मालिकेचं नाव आहे, ‘स्वरण घर’ (Swaran Ghar ). या मालिकेत अभिनेत्री संगीता घोष, रोनित रॉय, अजय चौधरी व वरूण बडोला मुख्य भूमिकेत आहे. याववर्षी फेब्रुवारीत ही मालिका सुरू झाली. संगीता घोष या मालिकेत स्वरणची भूमिका साकारते आहे.कॉमेडियन वीर दास याने या मालिकेचा सीन ट्विट केला आणि यानंतर नेटकऱ्यांनी या मालिकेची चांगलीच मजा घेतली. 

काय आहे सीनअभिनेत्रीची ओढणी पंख्यात अडकते आणि तिचा श्वास कोंडतो. अनेक प्रयत्न करूनही तिची ओढणी निघत नाही. मग काय? अभिनेता अखेर ओढणी दाताने कापूर अभिनेत्रीचा जीव वाचवतो, असा हा सीन आहे. या  सीनमध्ये चांगलाच ड्रामा पाहायला मिळतोय.

नेटकरी म्हणाले...हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी मालिकेवर एकापेक्षा एक भन्नाट कमेंट्स केल्यात. ती मुलगी प्लग का काढतेय, बटण बंद करून पण पंखा बंद होऊ शकतो..., अशी कमेंट एकाने केली आहे. कोणाकडे कात्री नव्हती का? अशी कमेंट अन्य एकाने केली. अरे ती दोन पावलं मागे जाऊ शकली असतील ना, अशा शब्दांत एका युजरने या मालिकेची टर उडवली आहे.

टॅग्स :टेलिव्हिजनटिव्ही कलाकारसोशल व्हायरल