ही घटना रात्री उशिरा घडल्याचे बोलले जात आहे. याविषयी अग्निशामक दलाकडून सांगण्यात आले की, आम्हाला ८ वाजून ७ मिनिटांनी घटनेची माहिती मिळाली. त्यानंतर ८ वाजून २५ मिनिटांनी फायर इंजीन आणि पाण्याच्या काही गाड्या घटनास्थळी पोहोचल्या. सध्या आग विझविण्याचे काम सुरू आहे.
असे म्हटले जात आहे की, आगीने तिसºया मजल्यावर भीषण रूप धारण केले होते. आग लागली तेव्हा स्टुडिओमध्ये ‘बेपनाह आणि हासिल’ या टीव्ही मालिकांचे शूटिंग सुरू होते. दोन्हीचे सेट बनविण्यात आले होते. सेटवर लहान मुलांसह कलाकार उपस्थित होते. जेव्हा आग लागल्याचे कळाले तेव्हा सर्व कलाकार आणि क्रू मेंबर्सला बाहेर काढण्यात आले. सध्या सर्व सुरक्षित असल्याची माहिती समोर येत आहे.
}}}} ">Fire at cinevista pic.twitter.com/ntejlDJ8KX— sandeep (@sandeepvns) January 6, 2018
पाच एकरात असलेल्या या स्टुडिओमध्ये जवळपास ३० पेक्षा अधिक शूटिंग लोकेशन आहेत. सिनेविस्टा स्टुडिओमध्ये अनेक मालिकांचे शूटिंग होत असते. या स्टुडिओमध्ये मालिकांसाठी तयार केलेले काही तात्पुरते तर काही कायमस्वरूपी असे सेट्स असून तीसपेक्षा जास्त शूटिंग लोकेशन्स आहेत. मालिका व सिनेमाच्या शूटिंगसाठी लागणारे कॅमेरे, लाइट्स अशा विविध साहित्याचे मोठे हबही या स्टुडिओमध्ये आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच मुंबईतील कमला मिल्स कंपाउंडमध्ये आगीची घटना घडली होती. या घटनेत १४ लोकांचा मृत्यू झाला होता. सुदैवाने या घटनेत असे काहीही घडले नसल्याने सुटकेचा नि:श्वास घेतला जात आहे.