Join us
Daily Top 2Weekly Top 5

क्रतिका परतली

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2016 15:50 IST

कसम तेरे प्यार की या मालिकेत क्रतिका सेनगर प्रमुख भूमिका साकारत होती. पण या मालिकेने लीप घेतल्यानंतर तिला 20 ...

कसम तेरे प्यार की या मालिकेत क्रतिका सेनगर प्रमुख भूमिका साकारत होती. पण या मालिकेने लीप घेतल्यानंतर तिला 20 वर्षांच्या मुलाच्या आईची भूमिका साकारायला लागणार होती. त्यामुळे तिने ही मालिका सोडण्याचा निर्णय घेतला. सध्या या मालिकेत शरद मल्होत्रा आणि शिवानी तोमर प्रमुख भूमिकेत झळकत आहेत. पण लीपनंतर या मालिकेचा टिआरपी दिवसेंदिवस ढासळत चालला आहे. प्रेक्षकांना शरद आणि शिवानीची केमिस्ट्री आवडत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे क्रतिकाला मालिकेत परत आणण्याचे प्रोडक्शन हाऊसने ठरवले आहे. आता मालिकेत जुन्या आठवणींमध्ये तिला दाखवण्यात येणार आहे. पण त्याचसोबत क्रतिकाला संपूर्णपणे मालिकेत परत कशाप्रकारे आणायचे यावर सध्या प्रोडक्शन हाऊस विचार करत आहे. त्यामुळे प्रेक्षकांना त्यांची लाडकी क्रतिका मालिकेत लवकरच पाहायला मिळणार आहे.