टीव्ही स्टार रजनीश दुग्गलने गतवर्षी ख्रिसमसला मुलीसोबत जाम मस्ती केली होती. यंदा तो दिवसा शूटींगमध्ये बिझी असेल पण रात्री फॅमिली आणि मित्रांसोबत ख्रिसमस डिनरवर जाणार आहे.
दिल से दिल तक या टीव्ही शोचा अभिनेता रोहन गंडोत्रा याने मित्रांसाठी पार्टी ठेवली आहे. आपल्या घरी त्याने ख्रिसमस ट्रीही सजवला आहे.
टीव्ही स्टार वाहबीज दोराबजी गतवर्षीप्रमाणे यंदाही माऊंट मॅरी चर्चमध्ये ख्रिसमस साजरा करणार आहे.
टीव्ही स्टार शीबा आणि भाग्यश्री दोघीही मैत्रिणी आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही या दोघी मित्रांसोबत ख्रिसमस साजरा करणार आहेत.
गेली चहल याच्यासाठी यंदाचा ख्रिसमस आहे. कारण त्याचा ‘टायगर जिंदा है’ हा चित्रपट रिलीज झाला आहे. यंदा तो खास सेलिब्रेशनच्या मूडमध्ये आहे.