Join us

चिन्मय येतोय रेती घेवून

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2016 01:00 IST

              अहो खरच चिन्मय रसिक प्रेक्षकांसाठी रेती घेऊन येत आहे. काय.. गोंधळात पडलात ...

              अहो खरच चिन्मय रसिक प्रेक्षकांसाठी रेती घेऊन येत आहे. काय.. गोंधळात पडलात ना... जास्त विचार करू नका. झेंडा, मोरया, लोकमान्य,  या एका पेक्षा एक उत्तम चित्रपटांमधून चित्रपटसृष्टीमध्ये स्वत:चा वेगळा प्रेक्षकवर्ग बनवलेला चिन्मय मांडलेकर आता रेती या चित्रपटामध्ये दिसणार आहे. तो या चित्रपटामध्ये एका ट्रक ड्रायव्हर ची भूमिका साकारणार आहे. तसेच हा चित्रपट रिलीज होण्याच्या आधीच  या चित्रपटातील  चिन्मय चा अख्खी मोसम नदी मुंबईच़्या समुद्रात रिकामी करणार आपण  हा डायलॉग भलताच फेमस झाला आहे. रेती नावाप्रमाणेच चित्रपटाची कथा कशावर आधारीत असेल याची कल्पना तुम्हाला आलीच असेल   त्यामुळे या चित्रपटाच्या कथेबद्दल जास्त चर्चा न करता या चित्रपटामध्ये चिन्मय समवेत किशोर कदम, शशांक शेंडे, संजय खापरे, सुहास पळशीकर, गायत्री सोहम आपल्याला दिसणार आहेत.