Join us
Daily Top 2Weekly Top 5

जीजी मां बनणार चार्ली चॅप्लिन!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2017 17:18 IST

अल्पावधीतच रसिकांची पसंती मिळवलेली टीव्ही मालिकेत एक वेगळा ट्रॅक पाहायला मिळणार आहे. 'जीजी मां' मालिकेमध्ये अभिनेत्री तन्वी डोग्रा चार्ली ...

अल्पावधीतच रसिकांची पसंती मिळवलेली टीव्ही मालिकेत एक वेगळा ट्रॅक पाहायला मिळणार आहे. 'जीजी मां' मालिकेमध्ये अभिनेत्री तन्वी डोग्रा चार्ली चॅप्लिनची व्यक्तिरेखा साकारून  रसिकांना खळखळु हसवताना दिसणार आहे.आगामी भागामध्ये तन्वी आपल्या बहिणीचे मन वळवण्याचा प्रयत्न करते कारण तिची बहिण तिच्यावर रागावलेली असते. यासाठी ती चार्ली चॅप्लिन बनते. त्यासाठी तिने चार्लीच्या सगळ्‌या करामती शिकल्या,  चार्लीसारखं चालणं-बोलणं,हसणं सगळ्या गोष्टी समजुन घेतल्या. या भूमिकेमुळे आता ती जणू सेटवरील मनोरंजक मॅस्कॉट बनली आहे. आणि सगळेच तिच्यासोबत सेल्फी आणि फोटो घेऊ लागले.तिला खरोखरच छान अनुभव आला आणि त्यामुळे तिला नाट्‌यमय दृश्यांपासून थोडा ब्रेकही मिळाला.ती म्हणाली, हा अनुभव खूपच छान होता.मला चार्ली चॅप्लिनचा प्रसिद्ध डान्स शिकता आला. तो जसा बोलायचा,चालायचा,जशी छडी पकडायचा, मी सगळं कॉपी करण्याचा प्रयत्न केला. चार्ली चॅप्लिन साकारताना वेगळीच मजा आली. ही भूमिका मलाही वेगळाच आनंद देऊन गेली.मला डान्स करायला आवडते त्यामुळे मला डान्स सीक्वेन्सही आवडला.या महान कलाकाराची नक्कल करणे किती कठीण होते यावर ती म्हणते, “मी त्यांची नक्कल करण्याचा प्रयत्न केला. अर्थातच त्यांचे कॉमिक टायमिंग मी मॅच करू शकले नाही.त्यांची नक्कल करणेही खूप कठीण असल्याचे माझ्या लक्षात आले.”‘जीजी माँ’ ही एक कौटुंबिक सूडकथा असून तिची अनोखी कथा प्रेक्षकांच्या पसंतीस पडली आहे. या मालिकेत लवकरच एक रोहित शेट्टीसारखा थरारक स्टंट प्रसंग साकारण्यात येणार असून तो मालिकेची नायिका तन्वी डोग्रा साकारणार आहे.या स्टंट प्रसंगात तन्वी (फाल्गुनी पुरोहित) ही बाइकवरून जात असून तिच्या मागे पल्लवी प्रधान (उत्तरादेवी) बसलेली असते.यावेळी तन्वी आपल्या बाइकसह एका मोटारीवरून उडी मारते आणि बाइक तशीच घेऊन जाते, असे दाखविण्यात आले आहे.असे थरारक स्टंट प्रसंग साकारण्यात रोहित शेट्टीचा हातखंडा असून जीजी माँसारख्या कौटुंबिक मालिकेत अशा स्टंट प्रसंगाने कर्मचा-यांमध्ये वेगळाच उत्साह निर्माण झाला होता.हवामान प्रतिकूल असतानाही या प्रसंगाचे यशस्वीरीत्या चित्रण करण्यात आले असून कलाकार आणि तंत्रज्ञांनी खूप मेहनतीने हा प्रसंग अस्सल वाटेल, अशा पध्दतीने चित्रीत केला आहे. या प्रसंगात सुरुवातीला तन्वीच्या मागे बसण्यास पल्लवी प्रधानने नकार दिला होता; परंतु तन्वीचे ड्रायव्हींग चागले असल्याचे विश्वास बसल्यावरच या स्टंटसाठी पल्लवी तयारी झाली.यासंदर्भात तन्वीने सांगितले की,“मला वाटलं मी बाइक  हवेत उड्या मारत असलेल्या रोहित शेट्टीच्याच एखादा प्रसंगच काम करत आहे. हा स्टंट उत्तमपणे साकारण्यात आला आहे.त्याचं चित्रीकरण करताना मला खूपच मजा आली. रोहित शेट्टीच्या एखाद्या स्टंट प्रसंगात काम करावं, असं मला वाटत आलं होतं.ते स्वप्न या निमित्ताने पूर्ण झाल्यासारखे वाटत आहे.”हा स्टंट करताना कोणालाही दुखापत होणार नाही,याची दक्षता निर्मात्यांनी घेतली होती.तन्वी आणि पल्लवीला हा स्टंट साकारताना पाहून प्रेक्षकांनाही सुखद धक्का असणार असल्याचे या दोघींनीही सांगितले.