'त्या'१०० सेकंदाने बदलले लारा दत्ता, अहमद खान आणि डेना अलेक्साचे आयुष्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2018 10:20 IST
&TV चा नवा आणि सध्या सर्वात जास्त चर्चेत असणारा डान्स रियालिटी शो हाय फिव्हर... डान्स का नया तेवर आता ...
'त्या'१०० सेकंदाने बदलले लारा दत्ता, अहमद खान आणि डेना अलेक्साचे आयुष्य
&TV चा नवा आणि सध्या सर्वात जास्त चर्चेत असणारा डान्स रियालिटी शो हाय फिव्हर... डान्स का नया तेवर आता १९ जोड्यांसह ऑडिशन्सकडून मेगा ऑडिशन्सकडे सरकत आहे. आपल्या जोडीदारासह केवळ नृत्यामध्येच नाही तर त्यांच्याशी भावनिकरित्यादेखील आपले न तुटणारे नाते आहे हे या जोड्यांनी सिद्ध केले आहे. मेगा ऑडिशन्समध्ये केवळ ११ जागांसाठी स्वतःला सिद्ध करत परीक्षकांना प्रभावित करण्यासाठी स्पर्धकांकडे केवळ १०० सेकंद असल्यामुळे ही स्पर्धा आता अधिकच कठीण झाली आहे. स्पर्धकांना देण्यात आलेल्या १०० सेकंदांच्या महत्त्वपूर्ण गोष्टींबद्दल बोलताना परीक्षकांनीदेखील त्यांच्या आयुष्यात या १०० सेकंदांचे महत्त्व आणि त्यांचे नशीब कसे कायमचे बदलले गेले हे सांगितले.याविषयी लारा दत्ताने सांगितले, “मिस युनिव्हर्स स्पर्धेदरम्यान, प्रश्नउत्तराच्या फेरीमध्ये टायमर चालू असतो आणि त्यावेळी तुम्हाला हेदेखील माहीत नसते की तुम्हाला कोणता प्रश्न येईल, त्यामुळे तुमच्याकडे कोणतेही उत्तर तयार नसते. प्रश्न विचारला गेला, त्याचक्षणी मला उत्तर तयार करून द्यावे लागले आणि त्या उत्तरातच माझे आयुष्य बदलण्याची ताकद होती. त्यामुळे तो माझ्यासाठी अभूतपूर्व क्षण होता.”डेना अलेक्साला विचारल्यावर तिचे उत्तर होते, “नृत्यांगना म्हणून माझे आयुष्य बदलेल, असे अनेक १०० सेकंद माझ्या आयुष्यात येऊन गेले आहेत पण माझ्यासाठी कायमस्वरुपी लक्षात राहणारा असा तो क्षण होता ज्यावेळी मी फ्रान्समध्ये माझा पहिला आंतरराष्ट्रीय परफॉर्मन्स स्वतः दिग्दर्शित करून त्यावर नृत्य केले होते. कोणताही आधीचा अनुभव नसताना मी स्टेजवर गेले होते आणि तो शो खूप मस्त झाला होता याचा मला आनंद आहे.” याबद्दल अहमद खानने सांगितले, “माझ्या डान्स करियरमध्ये अशा खूप ६० ते १०० सेकंदांना मी सामोरा गेलो आहे, पण एक क्षण असा होता जो मी कधीही विसरणार नाही जेव्हा मी ११ वर्षांचा होतो तेव्हा शेखर कपूर हवाहवाई गाणे करत असताना आम्ही १५-२० मुले मिस्टर इंडियाच्या सेटवर गेलो होतो. आम्हाला त्यावेळी ६०-१०० सेकंद परफॉर्म करण्यासाठी दिली होती आणि जेव्हा माझी पाळी आली तेव्हा मी नाचायला लागल्यावर त्यांनी मला कुठेच थांबवले नाही. मी ५ मिनिटे सतत नाचत होतो कारण त्यांना मी खूप आवडलो होतो.”