कविता कौशिकने एकता कपूरच्या ‘कुटुंब’ या मालिकेतून करिअरला सुरुवात केली होती. मात्र तिला खरी ओळख ‘एफआयआर’ या कॉमेडी मालिकेतून मिळाली. मालिकेतील तिची चंद्रमुखी चौटाला ही भूमिका खूपच पसंत केली गेली. विशेष म्हणजे पुढे तिला कविता कौशिक या नावाने नव्हे, तर चंद्रमुखी चौटाला या नावानेच ओळखले जाऊ लागले. या मालिकेमुळे कविताला खºया अर्थाने स्टारडम मिळाले. या व्यतिरिक्त कविता ‘नच बलिए’ या डान्स रिअॅलिटी शोमध्येदेखील आपला जलवा दाखविताना दिसली.
तसेच वेळोवेळी तिने तिच्या डान्सचे जलवेही दाखविले. त्याचबरोबर आता अशीही बातमी येत आहे की, टीव्हीची ही दबंग पोलीस अधिकारी ‘सावधान इंडिया’ हा शो होस्ट करताना दिसणार आहे. थोडक्यात ती पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर आपला दमदार अंदाज दाखविण्याची शक्यता आहे. दरम्यान, सध्या ती गुरदास यांच्यासोबत एका मोठ्या पंजाबी चित्रपटात काम करीत असून, दोघांचा रोमान्स सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.