चाहूलमध्ये अक्षर कोठारी साकारणार आव्हानात्मक भूमिका
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2017 14:42 IST
चाहूलमध्ये अक्षर कोठारी सर्जा ही भूमिका साकारत आहे. त्याच्या या भूमिकेला प्रेक्षकांची चांगलीच लोकप्रियता मिळत आहे. आता या मालिकेच्या ...
चाहूलमध्ये अक्षर कोठारी साकारणार आव्हानात्मक भूमिका
चाहूलमध्ये अक्षर कोठारी सर्जा ही भूमिका साकारत आहे. त्याच्या या भूमिकेला प्रेक्षकांची चांगलीच लोकप्रियता मिळत आहे. आता या मालिकेच्या कथानकाला एक वेगळेच वळण मिळणार आहे आणि यामुळे अक्षरला याच मालिकेत एक आव्हानात्मक भूमिका साकारण्याची संधी मिळणार आहे.चाहूल या मालिकेतील वाड्यातील भूताचे गूढ अजूनही कायम आहे. वाड्यातील भूत हे निर्मला असल्याचे प्रेक्षकांना माहीत असले तरी त्याबद्दल वाड्यातील कोणालाच कल्पना नाहीये. वाड्यातील भूत हे पुरुष अथवा लहान मूल नसून ते एक स्त्री असल्याचे शांभवीला नुकतेच कळले आहे. शांभवी वाड्यात घडणाऱ्या सगळ्या गोष्टींची उकल करण्याचा प्रयत्न करत आहे. पण या सगळ्यात आता सर्जाला भूत झपाटणार आहे. सर्जाला ज्या भूताने झपाटले ती निर्मला आहे की ती निर्मलाची काही खेळी आहे हा प्रश्न यामुळे पडणार आहे. पुढील काहीच दिवसांत सर्जाला भूताने झपाटलेले असल्याने प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. भूताने झपाटले हा अभिनय करणे हे अक्षर कोठारीसाठी आव्हानात्मक आहे. अक्षरने याप्रकारची भूमिका कधीही साकारलेली नसल्याने तो सध्या या भूमिकेसाठी प्रचंड मेहनत घेत आहे.तो गेल्या कित्येक दिवसापासून त्यावर काम करत आहे.अक्षर कोठारीने कमला या मालिकेत प्रमुख भूमिका साकारली होती. या मालिकेतील त्याची भूमिका प्रेक्षकांना खूपच आवडली होती. या मालिकेने काही महिन्यांपूर्वी प्रेक्षकांचा निरोप घेतला. त्यानंतर तो चाहूलमध्ये दिसला. तसेच तो प्रियांका चोप्राची निर्मिती असलेल्या काय रे रास्कला या चित्रपटात देखील एक महत्तावाची भूमिका साकारत आहे. क्वीनमेकर या त्याच्या नाटकाची देखील सध्या चांगलीच चर्चा आहे.