Join us

आखाड्यात बबिता फोगटचे 'बढो बहू'ला आव्हान!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2017 14:44 IST

आपल्या कुस्तीगीर पतीला आनंदी ठेवण्यासाठी वेगवेगळ्या परीक्षा आणि अडचणीतून जाणारी 100 किलो वजनाची बहू, बढो हिला आता स्वतःला सिद्ध ...

आपल्या कुस्तीगीर पतीला आनंदी ठेवण्यासाठी वेगवेगळ्या परीक्षा आणि अडचणीतून जाणारी 100 किलो वजनाची बहू, बढो हिला आता स्वतःला सिद्ध करण्यासाठी कठोर परिश्रम घेऊन आखाड्यात उतरावे लागणार आहे. यामध्ये तिला प्रतिस्पर्धी म्हणून 3 वेळा कॉमन वेल्थ चॅम्पियन असलेल्या बबिता फोगटला सामोरे जावे लागणार आहे. बढो बहू मालिकेत स्वत:च्याच भूमिकेतून बबिता टेलिव्हिजनवर पदार्पण करत आहे आणि पुन्हा एकदा स्वतःला सिद्ध करेल.हे आव्हान स्वीकारून आपला नवरा लाखाची (प्रिन्स नरूला) कारकीर्द एका अर्थाने पणाला लावली आहे. या वेगळ्या दंगलचे परिणाम काय होतील? ही दंगल बढो हरल्यास लाखा आणि तिचे सासरे – रघुवीर सिंग अहलावत या दोघांनाही कुस्ती सोडून द्यावी लागेल. एका बाजूला बढो संपूर्ण निष्ठेने प्रशिक्षण घेताना दिसेल. सगळे बढोला पाठिंबा देत असल्याचे पाहायला मिळेल, मात्र कमला आणि पिंकी नक्कीच बढोच्या मार्गात अडचणी निर्माण करतील.पण बढो तिच्या शेवटच्या श्वासापर्यंत लढा देण्यासाठी तयार आहे. ही अद्भूत कुस्ती पाहण्याचीवेगळीच मजा असेल.पदार्पणाविषयी बबिता म्हणाली,“स्वतःच्या भूमिकेत बढो बहूमधून टेलिव्हिजनवर पदार्पण करण्यासाठी मी खूपच उत्सुक आहे. खरेच, नेहमी काहीतरी वेगळे देणार्‍या अशा मालिकेशी जोडले जाणे याचा आनंद आहे. मला ही संकल्पना तसेच बहूचे सामर्थ्य आवडले. तिचे कौशल्य सर्वज्ञात आहे आणि तिच्या सासर्‍याकडून तिला संपूर्ण पाठिंबा आहे. हे खूपच पुरोगामी असून याला पाठिंबा द्यायला नक्कीच मला आवडेल. व्यक्तिशः, भविष्यात माझ्यासाठी काय ठेवले आहे याचा विचार न करता मी कधीही कुस्तीमध्ये हार मानत नाही.मला असे मनापासून वाटते की, कोणत्याही बाबतीत स्त्री ही पुरुषापेक्षा कमी नाही आणि स्वतःला सिद्ध करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागते.”याबद्दल विचारले असता र्‍यात्सा राठोड म्हणाली, 'बढो' अखेर आखाड्यात स्वत:ला सिद्ध करण्यास सज्ज झाली आहे. खरं सांगतेय, दंगलचे हे दृश्य बबिता फोगटसह चित्रित होणार, हे कळल्यानंतर मला आश्‍चर्यच वाटले. यापेक्षा आणखी काय हवे! मी बढोच्या भूमिकेसाठी बरीच मेहनत घेतेय. मात्र, इतक्या प्रतिभाशाली आणि नामवंत खेळाडूसोबत स्क्रीनवर दिसणे याची आता मी वाट पाहतेय.