Join us

"आपण पण काही कमी नाही...." कुशल बद्रिकेची पोस्ट चर्चेत, काय म्हणाला?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2025 13:16 IST

"ही म्हणजे तर तारेवरची कसरत..." कुशल बद्रिके पोस्ट शेअर करत म्हणाला...

अभिनेता कुशल बद्रिके हा मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेता. कुशलला आपण विविध मालिका, सिनेमांंमधून अभिनय करताना पाहिलंय. अभिनेता कुशल हा जितका त्याच्या अभिनयामुळे चर्चेत असतो, तितकाच त्याच्या सोशल मीडियावरील पोस्टमुळेदेखील चर्चेत असतो. काही गंभीर तर काही मजेशीर पोस्ट तो शेअर करताना दिसतो. नुकतंच अभिनेत्याने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत. त्याच्या या पोस्टने सध्या सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

सध्या कुशल बद्रिके त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केलेल्या मजेशीर पोस्टमुळे चर्चेत आला आहे. या पोस्टमध्ये त्याने लिहिलंय, "कॅमेरा कितीही ॲडव्हान्स झाला तरी माझे फोटो काही बरे येत नाहीत, त्यात नेमकं उभ कसं रहायचं कशी पोझ द्यायची ही म्हणजे तर तारेवरची कसरत. मग पाच-पन्नास फोटो काढल्यावर दोन-चार बरे येतात त्यांना छान एडिट केलं की वाटतं, सालाऽऽ आपण पण काही कमी नाही हां. आता असेच २/४ बरे आलेले फोटो बायकोला पाठवले तर ती म्हणते हे काय 'काली पिली टॅक्सी' बनून का फिरतोयस? आता काय करायचं", असं  म्हटलं. आता कुशलच्या या पोस्टवर चाहत्यांनी कमेंट्स केल्या आहेत. 

कुशल बद्रिकेच्या कामाबद्दल बोलायचे, तर तो सध्या 'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमात काम करताना दिसत आहे. मात्र, यावेळी कार्यक्रमाचे स्वरूप वेगळे असल्याचे दिसत आहे. भारत गणेशपुरे, प्रियदर्शन जाधव, कुशल बद्रिके, श्रेया बुगडे व गौरव मोरे या पाच कलाकारांच्या वेगवेगळ्या टीम आहेत. महाराष्ट्रातील अनेक कलाकार या कार्यक्रमात सहभागी झाले आहेत.  याशिवाय अभिजीत खांडकेकर या नवीन पर्वाचं सूत्रसंचालन करत आहे.

 

 

टॅग्स :कुशल बद्रिकेचला हवा येऊ द्यासोशल मीडिया