Join us

'चला हवा येऊ द्या' शोमधील हा कलाकार अडकला लग्नबेडीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2019 15:04 IST

झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय कार्यक्रम चला हवा येऊ द्यामध्ये आपल्या विनोदी अंदाजाने धमाल उडवून देणारा विनोदवीर नुकताच लग्नबेडीत अडकला आहे.

झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय कार्यक्रम चला हवा येऊ द्यामध्ये आपल्या विनोदी अंदाजाने धमाल उडवून देणारा विनोदवीर अंकुर वाढवे नुकताच लग्नबेडीत अडकला आहे. २८ जूनला अंकुरचा विवाह पार पडला. त्याने यवतमाळमध्ये कोर्ट मॅरेज केलं. त्यानंतर आता विदर्भातील पुसद गावात स्वागत समारंभ रविवारी (ता.30) पार पडणार आहे. 

अकुंर वाढवेचा जानेवारी महिन्यात साखरपुडा पार पडला होता. साखरपुडा झाल्याचे त्याने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून सांगितले होते. त्यानंतर आता यवतमाळ येथे त्याचे लग्न पार पडल्याचे समोर आले आहे.  

अंकुर अभिनेत्यासोबत उत्तम कवीदेखील आहे. त्याच्या पुन्हा प्रेमगीत गाण्यासाठी या कविता संग्रहाचे नुकतेच प्रकाशन करण्यात आले आहे.

त्याने करून गेलो गाव, गाढवाचं लग्न, सर्किट हाऊस, आम्ही सारे फर्स्ट क्लास, सायलेन्स व कन्हैया या नाटकात काम केले आहे.

तसेच जलसा चित्रपटातही त्याने काम केले आहे. मात्र चला हवा येऊ द्या या शोमधील छोटूच्या भूमिकेतून तो घराघरात पोहचला. 

टॅग्स :चला हवा येऊ द्याझी मराठी