Join us

थुकरट वाडीत येणार ही कलाकार मंडळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2019 06:30 IST

येत्या भागात थुकरटवाडीत ‘लव्ह यु जिंदगी’आणि 'नशीबवान' या चित्रपटातील कलाकारांची फौज सज्ज होणार आहे.

ठळक मुद्दे 'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमाने गाठला ४०० भागांचा यशस्वी पल्ला ‘लव्ह यु जिंदगी’आणि 'नशीबवान' या चित्रपटातील कलाकारांची फौज लावणार हजेरी

गेली चार वर्षे झी मराठी वाहिनीवरील ‘चला हवा येऊ द्या’ हा कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्र तसेच जगभरातील मराठी प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. प्रेक्षकांचे प्रेम आणि उत्तम प्रतिसादाने 'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमाने ४०० भागांचा यशस्वी पल्ला गाठला. आतापर्यंतच्या प्रवासात चला हवा येऊ द्यामध्ये प्रेक्षकांनी महाराष्ट्र दौरा, भारत दौरा आणि विश्व दौरा यांचा मनमुराद आनंद लुटला. ४०० भागांनंतर आता या कार्यक्रमात नवीन काय असा प्रश्न सर्वांसमोर उपस्थित झाला असताना नुकतेच चला हवा येऊ द्याचे नवीन पर्व होउ दे व्हायरल प्रेक्षकांच्या भेटीस आले. या पर्वात तुमच्या आमच्या सारख्या सामान्य लोकांनी प्रेक्षकांना हसवण्याचा विडा उचलला आहे.

येत्या भागात थुकरटवाडीत ‘लव्ह यु जिंदगी’आणि 'नशीबवान' या चित्रपटातील कलाकारांची फौज सज्ज होणार आहे. सचिन पिळगावकर, प्रार्थना बेहरे तसेच इतर कलाकार थुकरट वाडीत हजर असल्यावर त्यांच्या आणि प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी 'चला हवा हवा येऊ द्या' मधील विनोदवीर दमदार स्किट सादर करणार यात शंकाच नाही. सचिन पिळगावकर यांनी एका पेक्षा एक हिट चित्रपट मराठी सिनेसृष्टीला दिले. त्यातील एक चित्रपट म्हणजे 'आमच्या सारखे आम्ही' आणि याच चित्रपटावर आधारित विनोदी स्किट सादर करणार आहेत, त्यामुळे प्रेक्षक हसून लोटपोट होणार हे नक्की.  त्यामुळे ही सर्व धमाल ७ आणि ८ जानेवारी रोजी रात्री ९.३० वाजता फक्त  झी मराठीवर पाहायला विसरू नका.

टॅग्स :चला हवा येऊ द्यासचिन पिळगांवकर