Join us  

सौभाग्यनगरला घरफोडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 07, 2020 4:59 PM

लॅम्परोड सौभाग्यनगर येथील शांतीनिकेतनमधील बंद बंगल्याचा कडीकोयंडा तोडून अज्ञात चोरट्यांनी चार लाख रु पये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने व रोकड चोरून नेली.

नाशिकरोड : लॅम्परोड सौभाग्यनगर येथील शांतीनिकेतनमधील बंद बंगल्याचा कडीकोयंडा तोडून अज्ञात चोरट्यांनी चार लाख रु पये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने व रोकड चोरून नेली.ठाणे येथे राहणारे मिथुन विश्वनाथ दास यांचा लॅम्परोड सौभाग्यनगर येथील शांतीनिकेतनमध्ये स्वत:चा बंगला आहे. दास बंधू महिना-पंधरा दिवसांत शांतीनिकेतनमधील बंगल्यात येत असतात. मात्र कोरोना लॉकडाऊनमुळे मिथुन दास हे गेल्या ६ जून पासून ४ जुलैपर्यंत महिनाभर शांतीनिकेतनमधील बंगल्यात आले नव्हते. दरम्यानच्या काळात अज्ञात चोरट्यांनी बंगल्याच्या दरवाजाचा कडीकोयंडा तोडून आतमध्ये प्रवेश केला. बेडरूममधील कपाटाचे लॉक तोडून ३ लाख ९६ हजार रु पये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने व रोकड चोरून नेली. ४ जुलै रोजी मिथुन दास शांतीनिकेतनमधील बंगल्यात आले असता त्यांना घरफोडी झाल्याचे निदर्शनास आले. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :गुन्हेगारीचोरीपोलिस