विघ्नहर्ता गणेश या मालिकेचे बजेट तब्बल 300 कोटी
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2017 14:48 IST
गणपती बाप्पा हे सगळ्यांचे आराध्य दैवत आहे. या दैवताच्या आयुष्यावर आधारित विघ्नहर्ता गणेश ही मालिका लवकरच सुरू होणार आहे. ...
विघ्नहर्ता गणेश या मालिकेचे बजेट तब्बल 300 कोटी
गणपती बाप्पा हे सगळ्यांचे आराध्य दैवत आहे. या दैवताच्या आयुष्यावर आधारित विघ्नहर्ता गणेश ही मालिका लवकरच सुरू होणार आहे. या मालिकेच्या टीमने या मालिकेच्या कथानकावर प्रचंड मेहनत घेतली आहे. या मालिकेसाठी खूप संशोधनदेखील करण्यात आले आहे. या मालिकेच्या सेटवर देखील प्रचंड पैसा खर्च करण्यात आला आहे. यातील सेट्सची रचना खूप चांगली दिसावी यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. ऐतिहासिक वास्तव, धार्मिक ग्रंथ आणि पुस्तके यांचा विचार करून सेट बांधण्यात आला आहे. तसेच या मालिकेसाठी मो-कॅप तंत्रज्ञानाचा विचार करण्यात आला आहे. कोणत्याही मालिकेसाठी मो-कॅप तंत्रज्ञानाचा वापर करण्याची छोट्या पडद्यावरची ही पहिली वेळ आहे. या तंत्रज्ञानामुळे अधिकाधिक स्पेशल इफेक्टचा वापर करण्यात येणार आहे. त्यामुळे सगळ्या देवी-देवतांचे आणि त्यांच्या वाहनांचे दिव्य स्वरूप यात पाहायला मिळणार आहे. तसेच या मालिकेतील सगळ्या कलाकारांची रंगभूषा देखील खास असणार आहे. सर्व कलाकारांच्या पोशाख आणि आभुषणावर अनेकवेळा चर्चा करूनच त्यांचा पोशाख ठरवण्यात आला आहे. या मालिकेतील सगळ्या कलाकारांचा पोशाख हा खूप वेगळा असणार आहे. याविषयी या मालिकेच्या खात्रीदायक सूत्रांकडून माहिती मिळाली आहे. या मालिकेच्या टीमकडून सांगितले जात आहे की, गणेशाची ही पौराणिक मालिका अतिशय भव्य दिव्य असणार आहे. सेट्सपासून पोषाखापर्यंत सगळ्यांवर मेहनत घेतली जात आहे. या मालिकेत सुमारे 100 विविध देव-देवता आणि त्यांची वाहनं पाहायला मिळणार आहेत. या शोचे बजेट अतिशय जास्त म्हणजे जवळजवळ 300 कोटींच्या आसपास असणार आहे. ही मालिका प्रेक्षकांना आवडेल अशी आम्हाला सगळ्यांना खात्री आहे.विघ्नहर्ती गणेश या मालिकेत उझैर बसर छोटा गणेशची भूमिका साकारणार आहे. Also Read : विघ्नहर्ता गणेश या मालिकेत उझैर बसर बनणार छोटा गणेश