Join us
Daily Top 2Weekly Top 5

अक्षता पडण्यापूर्वी फोटोग्राफर्सनं केली विनंती, लग्नाच्या काही तास आधी गौहर खाननं दिला 'सुखद धक्का'

By गीतांजली | Updated: December 24, 2020 13:55 IST

लग्नाच्या काही तास आधी गौहर खान मीडियासमोर आली.

प्रसिद्ध अभिनेत्री गौहर खान लवकरच लग्न करणार आहे. लग्नाच्या काही तास आधी गौहर खान मीडियासमोर आली आणि त्याच्याशी गप्पदेखील मारल्या.  मीडिया फोटोग्राफर्सनी गौहर खानला लग्नासाठी शुभेच्छा दिल्या. हे ऐकून गौहर खान लाजू लागली. मीडिया फोटोग्राफर्सची एक्साइटमेंट बघून गौहर हसू लागली. गौहर लगेच म्हणाली अजून लग्नाचे फंक्शन सुरु झालेले नाही. गौहरने सर्व फोटोग्राफर्सचे आभार मानले. वेडिंग मेन्यूवर जाण्यापूर्वी गौहरने फोटोग्राफरना सांगितले की लग्नानंतर सगळ्यांनी घरी नक्की या. आपल्या घरी येण्याचे आमंत्रण देत गौहर खानने सांगितले की आईने आपल्यासाठी मिठाई तयार करणार आहे. 

25 डिसेंबरला गौहर आणि जैदचा निकाह होणार आहे.  चिस्का सेरेमनीमधील गौहर व जैदचे डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. गौहर व जैदसोबत त्यांच्या कुटुंबीयांनाही जबरदस्त डान्स केला होता. जैद हा अभिनेता, इफ्लूएंसर, कंटेट क्रिएटर आहे.

सोशल मीडियावर त्याचे भरपूर फॉलोअर्स आहेत. तो एक प्रोफेशनल डान्सरही आहे. तो म्युझिक व्हिडीओ छमियामध्ये शक्ती मोहन आणि वेस्ट इंडीजचा क्रिेकेटर ड्वेन ब्राओसोबत दिसला होता.

गौहर व जैद यांच्या वयातील अंतर. होय, गौहर तिच्या होणा-या पतीपेक्षा 12 वर्षांनी मोठी आहे. यावरून गौहर ट्रोल सुद्धा होत आहे. अलीकडे तिने या ट्रोलर्सला सणसणीत उत्तर दिले होते.

टॅग्स :गौहर खान