Join us

मालिका आणि सिनेमा कलाकारासाठी दोन्ही महत्त्वाची माध्यम

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2016 18:19 IST

'फुड्डू' हा तिचा पहिला हिंदी सिनेमा. या सिनेमात ती झळकली.

वेगवेगळ्या मालिकेत आपल्या अभिनयाने रसिकांचे मनोरंजन केल्यानंतर अनेक कलाकार सिनेमाकडे वळतानाची अनेक उदाहरणे आहेत. अशाच प्रकारे मालिकामध्ये रसिकांचे मनोरंजन केल्यानंतर शिवानी गोसेननही रूपेरी पडद्यावर एंट्री केली. 'फुड्डू' हा तिचा पहिला हिंदी सिनेमा. या सिनेमात ती झळकली. एक मुलगा स्वप्ननगरी मुंबईत येतो. मुंबईत चाळीत राहण्यापासून ते अनेक समस्यांना त्याला कशाप्रकारे सामना करावा लागतो. यावर सिनेमाची कथा भाष्य करते. सिनेमात काम करण्याची संधी मिळणेच खूप मोठी आनंदाची गोष्ट असल्याचे शिवानीने सांगितले. टीव्ही मालिकासांठी चांगली ऑफर्सची वाट बघत असल्याचेही शिवानीने म्हटले आहे. यापूर्वी शिवानीने कसौटी जिंदगी की, कहानी घर घर की, लव्ह यु जिंदगी, रंग बदलती ओढणी, पिया का घर प्यारा लगे, ये वादा रहा अशा टीव्ही मालिकांमध्ये वेगेवगळ्या भूमिका शिवानी गोसैनने साकारल्या आहेत.