Join us
Daily Top 2Weekly Top 5

बॉलिवूड दिवा जुही चावला आणि तब्बू या वीकेंडला 'एंन्टरटेनमेंट की रात'च्या सेटवर अशी केली धमाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2017 15:59 IST

एंटरटेनमेंट की रात त्याच्या प्रेक्षकांना सातत्याने हास्य, मस्ती आणि मनोरंजनाची रेलचेल पुरवत आहे.प्रत्येक एपिसोड मध्ये. हेच पुढे चालू ठेवत, ...

एंटरटेनमेंट की रात त्याच्या प्रेक्षकांना सातत्याने हास्य, मस्ती आणि मनोरंजनाची रेलचेल पुरवत आहे.प्रत्येक एपिसोड मध्ये. हेच पुढे चालू ठेवत, सदाबहार बॉलीवूड तारका जुही चावला आणि तब्बू या वीकेंडला विशेष अतिथी म्हणून पहायला मिळणार आहेत.तब्बू आणि जुही चावला त्यांची गुपिते उघड करताना, त्यांच्या करियर मधील चढउतारां विषयी आणि काही उत्सुकतेने भरलेले चुटकुले सांगताना दिसणार आहेत. शाहरुख खान सोबतच्या पहिल्या भेटी विषयी बोलताना जुहीने सांगीतले की तिला आधी वाटले होते की तो आमीर खान सारखा चॉकलेट बॉय सारखा दिसत असेल पण त्याला राजू बन गया जंटलमनच्या सेट वर पाहिल्या नंतर तिच्या अपेक्षे प्रमाणे तो नसल्याचे तिला आढळून आले,आता ते दोघे इतके चांगले मित्र आहेत की त्या घटनेवर हसतात.तर तब्बूने सांगीतले तिच्या उंचीच्या समस्ये बद्दल, की तिला शाळेस शिक्षक शेवटच्या बेंचवर बसवत असत तिच्या उंची मुळे.मनोरंजन अजून उंचावण्यासाठी,मलिश्का जुही आणि तब्बू दोघींनाही खेळ खेळण्यास सांगणार आहे ज्यात त्यांच्या डोळ्यावर पट्टी बांधली जाणार आहे आणि त्यांना त्यांच्या पुढे असलेल्या गोष्टी ओळखाव्या लागणार आहेत, तेही मजेदार कलाटणीसह. तब्बू आणि जुही चावला यांच्या तील मिक ड्रॉप रॅप लढाई हा या एपिसोडचा मुख्य भाग असणार आहे.मिक ड्रॉप रॅप लढाई यांच्यातील कोणती सुंदरी जिंकणार याकडेच सा-यांच्या नजरा लागल्या आहेत.Also Read:या कलाकाराला एका कॉमेडी शोसाठी स्पेनमध्ये द्यावे लागले ऑडिशन!कोणत्याही शोमध्ये एंट्री होण्यासाठी ऑडिशन द्यावी लागते हे आपण ऐकलेले आहे.विविध कॉमेडी शोमध्ये आलेल्या कलाकारांना ऑडिशन देऊन स्वतःला सिद्ध करावं लागतं.संगीत रिअॅलिटी शोबाबतही उद्योन्मुख गायकांना आपल्या सूरांची जादू ऑडिशनमध्ये दाखवावी लागते. या ऑडिशनमधील परफॉर्मन्सवरच त्यांची शोमधील पुढच्या प्रवासासाठी वर्णी लागते.‘जमाई राजा’ या छोट्या पडद्यावर गाजलेल्या मालिकेतील एका अभिनेत्यालाही ऑडिशन द्यावे लागले होते. ऑडिशनमुळेच त्याची एका कॉमेडी शोमध्ये वर्णी लागली. हे वाचून तुम्हाला नवल वाटलंच असेल. कारण नव्या कलाकारांना ऑडिशनची गरज भासत असून प्रस्थापित कलाकारांना ऑडिशन द्यावी लागत नाही. मात्र जमाईराजा फेम अभिनेता रवी दुबेबाबत असाच एक ऑडिशनचा खास किस्सा आहे. त्याला 'एंटरटेन्मेंट की रात' या शोसाठी चक्क स्पेनमध्ये ऑडिशन द्यावी लागली.