Join us
Daily Top 2Weekly Top 5

बंगाली अभिनेत्री स्वेता भट्टाचार्य या मालिकेद्वारे करणार हिंदी टेलिव्हिजनवर पदार्पण

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2017 12:55 IST

छोट्या पडद्यावरील आपला आगामी फॅमिली कॉमेडी शो जय कन्हैय्या लाल की सुरू करण्यासाठी सज्ज आहे. यात विशाल वशिष्ठाची भूमिका ...

छोट्या पडद्यावरील आपला आगामी फॅमिली कॉमेडी शो जय कन्हैय्या लाल की सुरू करण्यासाठी सज्ज आहे. यात विशाल वशिष्ठाची भूमिका आहे. हा शो लोकप्रिय बंगाली टिव्ही शो भोजो गोबिंदोचा रिमेक असणार आहे. यात लोकप्रिय बंगाली टीव्ही अभिनेत्री स्वेता भट्टाचार्य पदार्पण करणार आहे.स्वेता यात दालीची भूमिका करणार असून ती ह्या शोमधील एक श्रीमंत आणि अतिशय लाडावलेली मुलगी आहे.स्वेता म्हणाली,“जय कन्हैय्या लाल कीचा हिस्सा बनताना मला खूप छान वाटतंय.मी ह्या शोसाठी होकार दिला कारण याचे कथानक खास आहे.जेव्हा निर्मात्यांनी मला ही कथा ऐकवली तेव्हा मी नाही म्हणूच शकले नाही. ह्या शोमधील अतिशय आव्हानात्मक भूमिका मी साकारणार आहे. मला आशा आहे की माझ्या चाहत्यांना माझे प्रयत्न आवडतील.” दालीची भूमिका साकारणे निश्चितपणे कठीण आहे पण आम्हांला आशा आहे की स्वेता त्याला पूर्ण न्याय देईल.हलके फुलके कौटुंबिक नाट्‌यावर आधारित 'जय कन्हैय्या लाल की' ही मालिका रसिकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाली आहे.ही मालिका ‘भोजो गोबिंदो’चा रिमेक असणार असून यात तीन प्रमुख व्यक्तिरेखा असणार आहे.जानकी नाथ चौधरी,दाली आणि कन्हैय्या यांचा समावेश असेल.हा शो एक श्रीमंत आजोबा जानकी नाथ चौधरी आणि त्यांची अतिशय लाडावलेली नात दालीची कथा आहे. ह्या शोमध्ये अभिनेता विशाल वशिष्ठला बावर्चीच्या भूमिकेत झळकणार आहे.याबद्दल विशाल वशिष्ठ म्हणाले, “जय कन्हैय्या लाल कीचा हिस्सा बनताना मला खूप आनंद होत आहे.ह्या शो ची संकल्पना खास असून त्यामुळे मी ह्या शोला नकार देऊ शकलो नाही.मी यात कन्हैय्याची भूमिका साकारत असून तो सगळ्‌याच बाबतीत हुशार असल्याते दाखवण्यात आले आहे.त्याच्याकडे प्रत्येक प्रॉब्लेमचे सोल्युशन असते.आपल्या भन्नाट शक्कल लढवत जेव्हा कन्हैय्या चौधरींच्या घरातील समस्या सोडवेल ते पाहणे निश्चितपणे रंजक असणार आहे.