Join us

बिग बॉसमध्ये पहिल्यांदाच घडणार ही गोष्ट, सलमान खानने देखील दिला होकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2021 15:51 IST

हा सिझन हा इतर सिझनपेक्षा खूप वेगळा असणार आहे.

ठळक मुद्देया कार्यक्रमाच्या १४ व्या सिझनमध्ये अभिनव शुक्ला आणि रुबीना दिलैक तसेच अली गोनी आणि जस्मिन भसीन हे दोन कपल आपल्याला पाहायला मिळाले होते.

बिग बॉस या कार्यक्रमाला चांगलीच लोकप्रियता असून या कार्यक्रमाचे आजवरचे सगळेच सिझन लोकांनी डोक्यावर घेतले आहेत. हा सिझन हा इतर सिझनपेक्षा खूप वेगळा असणार आहे. यंदाच्या सिझनमध्ये केवळ कपल असणार असल्याची चर्चा रंगली आहे. 

या कार्यक्रमाच्या १४ व्या सिझनमध्ये अभिनव शुक्ला आणि रुबीना दिलैक तसेच अली गोनी आणि जस्मिन भसीन हे दोन कपल आपल्याला पाहायला मिळाले होते. सामान्य लोकांनाच नव्हे तर सलमानला देखील ही गोष्ट आवडली होती आणि त्याचमुळे सलमानने देखील कपल स्पेशलसाठी होकार दिला असल्याची चर्चा सध्या रंगली आहे. 

बिग बॉस या कार्यक्रमाचा नवा सिझन ऑक्टोबरमध्ये सुरू होणार असून या कार्यक्रमात कोण कोण कपल भाग घेऊ शकतात याचा शोध सध्या कार्यक्रमाच्या टीमकडून लावला जात आहे. नुकत्याच लग्न झालेल्या कपलसोबत चर्चा सुरू असल्याचे म्हटले जात आहे. तसेच याशिवाय ब्रेकअप झालेले कपल देखील या कार्यक्रमात दिसणार असल्याचे म्हटले जात आहे. 

टॅग्स :बिग बॉससलमान खान