Join us

बिग बॉस : स्वामी ओम, प्रियंकाच्या विरोधात एकवटले घरवाले

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2016 16:36 IST

सध्या बिग बॉसच्या घरात जबरदस्त घमासान बघावयास मिळत असून, एका टास्कवरून घरातील स्पर्धक स्वयंघोषित बाबा स्वामी ओम आणि प्रियंका ...

सध्या बिग बॉसच्या घरात जबरदस्त घमासान बघावयास मिळत असून, एका टास्कवरून घरातील स्पर्धक स्वयंघोषित बाबा स्वामी ओम आणि प्रियंका जग्गा यांच्या विरोधात एकवटले आहेत. जोपर्यंत या दोघांना घराबाहेर काढले जात नाही, तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही असा पवित्रा घरातील अन्य सदस्यांनी घेतल्याने या दोघांवर काय कारवाई केली जावी, असा पेच बिग बॉससमोर निर्माण झाला आहे.}}}} त्याचे झाले असे की, बिग बॉसने दिलेल्या ‘प्यार का तोहफा’ या टास्कमध्ये खलनायकाची जबाबदारी स्वामी ओम आणि प्रियंका जग्गा यांच्यावर सोपविण्यात आली होती; मात्र त्यांनी या जबाबदारीचा फायदा घेत घरात असा काही राडा केला की, त्यामुळे इतर सर्वच सदस्य हतबल झाले. बिग बॉसने प्रियंका जग्गा आणि स्वामी ओमच्या वर्तणुकीमुळे हा टास्क दोनदा थांबविण्याचे आदेश दिले. परंतु प्रियंका जग्गा हिने हुज्जत घालणे कायम ठेवल्याने घरातील वातावरण प्रचंड संतप्त झाले. प्रियंकाने मोनालिसाला टार्गेट करीत तिच्या पर्सनल आयुष्याविषयी बोलत तिच्याशी वाद घातला. त्यामुळे मनू आणि मनवीर प्रचंड संतप्त झाले. त्यांनी घरात राडा करीत हा दोघांना जोपर्यंत घराबाहेर काढले जात नाही, तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही असा पवित्रा घेतला. }}}} या वादात स्वामी ओमनेही उडी घेतल्याने घरतील वातावरण चांगलेच संतप्त झाले. मनू आणि मनवीरमध्ये धक्काबुक्की झाल्याने घरातील अन्य सदस्य घाबरून गेले. स्वामी ओमने मनूशी वाद घालण्यात कुठलीच कसर सोडली नसल्याने बिग बॉसच्या रागाचा पारा प्रचंड घसरला. त्यांनी स्वामी ओम, प्रियंका जग्गा यांना खडेबोल सुनावत सुधारण्याची आणखी एक संधी दिली. आता ‘विकेण्ड का वॉर’मध्ये सलमान स्वामी ओम आणि प्रियंका जग्गा यांचा समाचार कसा घेणार हे बघणे औत्सुक्याचे ठरेल. बहुधा स्वामी ओम आणि प्रियंका जग्गा यांना याची कुणकुण लागली असावी.