‘बिग बॉस सीझन ११’ सलमान खान नव्हे तर ‘हा’ सुपरस्टार करणार होस्ट!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2017 21:32 IST
वादग्रस्त रिअॅलिटी शो ‘बिग बॉस’चा सर्वाधिक पॉप्युलर होस्ट सलमान खान याने यावेळेस कुठल्याही परिस्थितीत शोला होस्ट करणार नसल्याचे ठरविले ...
‘बिग बॉस सीझन ११’ सलमान खान नव्हे तर ‘हा’ सुपरस्टार करणार होस्ट!!
वादग्रस्त रिअॅलिटी शो ‘बिग बॉस’चा सर्वाधिक पॉप्युलर होस्ट सलमान खान याने यावेळेस कुठल्याही परिस्थितीत शोला होस्ट करणार नसल्याचे ठरविले आहे. वास्तविक सलमानने यापूर्वीही अनेकदा शोला होस्ट करणार नसल्याचे म्हटले आहे; परंतु अशातही तो प्रेक्षकांना बघावयास मिळाला आहे. मात्र सीझन ११ साठी पुन्हा बिग बॉसच्या शोमध्ये परतणार नसल्याचे आता स्पष्ट झाले आहे. त्यामुळे सलमानची जागा त्याचाच जवळचा मित्र अन् बॉलिवूडचा सुपरस्टार अक्षय कुमार घेणार असल्याचे समजते. सध्या बिग बॉस सीझन ११ ची घोषणा करण्यात आली असून, होस्ट आणि कंटेस्टंट्स निवडीबाबत चर्चा रंगत आहे; मात्र आता होस्टचा शोध संपला असून, सलमानच्या जागी अक्षयची वर्णी लागणार आहे. सूत्रानुसार अक्षयचे नाव निश्चित करण्यात आले असून, तोच हा शो होस्ट करणार आहे. बिग बॉस व्यतिरिक्त अक्षय ‘दस का दम’ हा शोदेखील होस्ट करणार असल्याची बातमी आहे. त्यामुळे छोट्या पडद्यावरील सलमानच्या सर्व शोवर अक्षय कब्जा करताना दिसला तर नवल वाटू नये. खरं तर आतापर्यंतचा जर इतिहास बघितला तर सलमानने आतापर्यंत जे शो सोडले त्याठिकाणी अक्षयची वर्णी लागली आहे. सुरुवातीला ‘दस का दम’ आणि आता ‘बिग बॉस सीझन११’ मध्ये अक्षय सलमानची जागा घेणार आहे. वास्तविक सलमान आणि अक्षय खूप चांगले मित्र आहेत. बिग बॉसच्या सेटवर अक्षयने बºयाचदा त्याच्या चित्रपटाचे प्रमोशन केले आहे. यादरम्यान दोघांमध्ये रंगलेली जुगलबंदी बघण्यासारखी होती. जेव्हा-जेव्हा हे दोघे शोमध्ये एकत्र आले तेव्हा ते माध्यमांमध्ये बºयाच काळ चर्चिले गेले. याशिवाय निर्माता आणि दिग्दर्शक करण जोहरच्या चित्रपटातही दोघे झळकले आहेत. खरं तर गेल्या कित्येक सीझनमध्ये सलमान खानने त्याच्या अंदाजात बिग बॉसचा शो होस्ट केला आहे. शिवाय तो प्रत्येक वेळी शो सोडणार असल्याचेही सांगत आला आहे. शोमधील वाद, स्पर्धकांमध्ये शिवीगाळ हा सर्व प्रकार त्याला संतापजनक वाटायचा. त्यामुळे यासर्व प्रकाराचा आपल्या इमेजवर परिणाम होऊ नये म्हणून त्याने शो सोडण्याचे बºयाचदा म्हटले. अखेर आता त्याने शो सोडण्याबाबत पक्का निर्णय घेतला आहे. सलमान बिग बॉस सीझन ४ पासून या शोला होस्ट करत आहे.