Join us  

Bigg Boss OTT : शमिता भावुक झाली आणि आत्तापर्यंत कोणालाही ठाऊक नसलेली गोष्ट जगापुढं आली..!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 08, 2021 5:44 PM

Bigg Boss OTT : शमिताने बिग बॉसच्या घरात आयुष्यातील एक मोठा खुलासा केला आहे. हा खुलासा करताना तिला अश्रू आवरता आले नाहीत.

ठळक मुद्देतूर्तास शमिता व राकेश यांच्यात मतभेद निर्माण झाल्याचं पाहायला मिळतंय. गेल्या एपिसोडमध्ये दोघांमध्येही जोरदार भांडण झालं होतं.

बिग बॉस ओटीटी’ची (Bigg Boss OTT) स्पर्धक शमिता शेट्टी (Shamita Shetty) सध्या चांगलीच चर्चेत आहे. कधी राकेश बापटसोबतची (Raqesh Bapat) बिग बॉसच्या घरातील तिची रोमॅन्टिक केमिस्टी, कधी नेहा भसीनसोबतची मैत्री तर कधी प्रतिक सेहजपालसोबतचा वाद या ना त्या कारणानं शमिता शेट्टीचीच चर्चा होतेय. आता शमिताने बिग बॉसच्या घरात आयुष्यातील एक मोठा खुलासा केला आहे. हा खुलासा करताना तिला अश्रू आवरता आले नाहीत. नेहा भसीनसोबत बोलताना तिनं आपलं मन मोकळं केलं.नेहासोबत गप्पा मारता मारता शमिता भावुक झाली आणि आत्तापर्यंत कोणालाही ठाऊक नसलेली गोष्ट जगापुढं आली.

होय, आपल्या पहिल्या बॉयफ्रेन्डला अपघातात गमावल्याचं तिनं सांगितलं. ‘मी 18 वर्षांची असताना माझ्या पहिल्या बॉयफ्रेन्डचा एका कार अपघातात मृत्यू झाला. मी त्याला कायमचं गमावलं. त्यामुळेच मी इतकी हळवी झालेय. याच कारणामुळे मी इतकी वर्ष माझ्या आयुष्यात कोणाला येऊ दिलं नाही. अनेक वर्षानंतर मी राकेशच्या जवळ आले. कारण मला तो चांगला व्यक्ती वाटतो,’असं शमिता नेहाला सांगतेय.

यावर नेहाही तिला समजवण्याचा प्रयत्न करतेय. गेल्या चार आठवड्यात राकेशनं तुला प्रत्येकवेळी सोबत दिली आहे, असं नेहा तिला म्हणते. तुम्हाला ठाऊक आहेच की, शिल्पा शेट्टीची बहीण शमिता शेट्टी अद्याप सिंग आहे. राकेश बापटचाही रिद्धी डोग्रासोबत घटस्फोट झाला आहे.तूर्तास शमिता व राकेश यांच्यात मतभेद निर्माण झाल्याचं पाहायला मिळतंय. गेल्या एपिसोडमध्ये दोघांमध्येही जोरदार भांडण झालं होतं. शमिताने बॉलिवूडसोबतच दाक्षिणात्य चित्रपटातही काम केलं आहे.  बहीण शिल्पा शेट्टीने बिग ब्रदर या कार्यक्रमाचं विजेतेपद मिळवल्यानंतर तीदेखील बिग बॉसमध्ये झळकली होती. पण काही कारणांनी तिला बिग बॉसचं घर सोडावं लागलं होतं. यानंतर ‘झलक दिखला जा’ या कार्यक्रमात तिनं तिचं नृत्यकौशल्य दाखवलं होतं.      

टॅग्स :बिग बॉस